Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवस्फुर्ती जिर्णोद्धार सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी रहावे मराठा महासंघाचे जाहीर आवाहन.!

Mar 12, 2022


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या बहुजन हिताच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी नांदगाव शहरातील शिवस्फूर्ती मैदानावरील शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात होणार आहे नांदगाव तालुका पंचक्रोशीतील तमाम शिवभक्त बहुजन समाजाने हा नयनरम्य सोहळा याची देहा याची डोळा पाहून कायम स्मरणात जतन करून ठेवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने हजर राहावे असे जाहीर आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे

गेल्या 14 वर्षांपासून नियमितपणे या शिवस्मारकाचे सातत्याने स्वखर्चाने पूजाअर्चा व देखभाल करणाऱ्या शिवभक्त सौ संगिताताई सोनवणे यांनी या शिवस्मारकाची झालेली पडझड दुरवस्था बघून स्मारकाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न सुरू केले परंतु कोणीही दखल न घेतल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता खरं तर तमाम शिवभक्तांसाठी ही शरमेची तसेच लाजिरवाणी बाब होती की शिवरायांच्या स्वराज्यात शिवस्मारकाच्या नूतनीकरणासाठी एका महिलेला आमरण उपोषण आंदोलन करण्याची वेळ यावी आणि याच रोष भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नांदगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेतला आणि रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला,

या उग्र आंदोलनाची नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार माननीय सुहास आण्णा कांदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि युद्धपातळीवर प्रशासकीय हालचाली करून आमदार निधीतून वीस लाख रुपये निधी मंजूर करून आंदोलनाच्या दिवशीच भूमिपूजन करून काम सुरू केले होते रात्रीचा दिवस करून अतिशय वेगाने हे काम पूर्ण होऊन सुंदर असे शिवस्मारक आज नांदगाव शहराच्या लौकिकात एक मानबिंदू म्हणून उभे झाले आहे याचा विशेष आनंद संपूर्ण बहुजन समाजाला झाला आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]