Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आता मिळणार तीन एक्स्प्रेस गाड्यांचे जनरल तिकीट : रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mar 14, 2022

कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षाहून अधिक कालावधीपासून रेल्वेची जनरल तिकीट बंद आहे. यानंतर रेल्वे सुरळीत झाल्या असल्या तरी प्रवाशांना आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही.

परंतु, आता मुंबईकडे धावणाऱ्या आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम, नांदेड- मुंबई राज्यराणी आणि नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये विनाआरक्षण तिकिटाला शनिवारपासून (दि.१२) सुरुवात झाली आहे. मुंबईकडून येणाऱ्या या रेल्वेंसाठी विनाआरक्षण तिकीट या महिन्याखेर मिळण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

खासदार हेमंत गोडसे, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याबाबतही यावेळी मागणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाचा निर्णय प्रवाशांसाठी सकारात्मक
रेल्वे प्रशासनाने तीन एक्स्प्रेसमध्ये सर्वसाधारण तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचे प्रवासी स्वागत करत आहेत. प्रशासनाने आता गोदावरी एक्स्प्रेस, इगतपुरी- भुसावळ शटल आणि नाशिक- भुसावळ पॅसेंजर त्वरित सुरू करावी. – नरेंद्र खैरे

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हीडीओ)मुख्यमंत्री पदी एकनाथजी शिंदे : मनमाडला पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ...

read more

(बघा व्हीडीओ) नांदगाव शहर शिवसेना शिंदे गट व भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

नांदगाव : भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट युतीचे एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र...

read more

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदा सह आमदारकीचा राजीनामा

गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]