मनमाड शहरातीलअग्रगण्य समजली जाणारी प्रगती बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १७ जुलै रोजी होणार होणार होती. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ३५ जणांनी अर्ज दाखल केले होते.उपनिबंधक कार्यालयात झालेल्या छाननीत सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले.सर्वसाधारण १० जागांसाठी २३ अर्ज, त्यात दोन महिला राखीव जागांसाठी चार, अनुसूचित – जाती जमाती एक जागेसाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते तर इतर मागासवर्ग एक जागेसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर भटक्या विमुक्त एका जागेसाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.मात्र माघारीची मुदत २२ जून ते ६ जुलै पर्यंत होती मात्र त्या अगोदरच माघारी विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी आज नाट्यमयरित्या माघार घेतली. प्रगती बँकेतील ज्येष्ठ संचालक तसेच जैन समाजातील ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देत विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या विनंतीला मान देत अर्ज माघारी घेतले. त्यामुळे सर्वसाधारण गटातून श्री.ललवाणी कल्याणचंद मानकचंद,श्री.सुराणा हिरालाल(पोपटभाऊ)सुरजकरण,श्री.संकलेचा सुभाष कुंदनमल, श्री शिंगी अशोक पुशमल, श्री.शिंगी नवीन पन्नालाल, श्री.बाफना मनोज सुरजमल,श्री.ललवाणी संदीप शिवचंद, श्री.कुलकर्णी संदीप लक्ष्मण, श्री.भंडारी सुनील गणेशमल, श्रीमती पुष्पा विनोद ललवाणी तर महिला राखीव गटातून राका पुष्पाबाई प्रकाश, लोढा पुष्पा विजय तसेच इतर राखीव गटातून ( इतर मागास वर्ग) श्री.वरखेडे पंढरीनाथ गोपाळराव, श्री.गवळी मनोज सखाराम (भटक्या विमुक्त) तसेच श्री. हादगे दत्तात्रय माधवराव ( अनुसूचित जाती जमाती) यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची निवडीची अधिकृत घोषणा ७ जुलै रोजी होईल. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे ठिणगी तर्फे अभिनंदन!
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











