मनमाड शहर तसेच परिसरातील चाकरमान्यांची हक्काची मनमाड – कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस कोविड काळापासून रद्द करण्यात आली होती. वेळोवेळी निवेदने आणि मागण्या करून अखेर रेल्वे प्रशासनाने 02102 मनमाड ते सीएसटी तथा 02101 सीएसटी ते मनमाड सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला होता.ह्या गाडीमुळे मनमाड व परिसरातील चाकरमाने आणि व्यापारी ह्यांची नाशिक व मुंबई जाण्यासाठी चांगली सोय झाली होती आता प्रशासनाने ह्या गाडीला मुदतवाढ देऊ केली असून आता ही गाडीला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देऊन जनतेला दिलासा दिला आहे.













