loader image
[ays_poll id=7]

आता मिळणार तीन एक्स्प्रेस गाड्यांचे जनरल तिकीट : रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mar 14, 2022

कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षाहून अधिक कालावधीपासून रेल्वेची जनरल तिकीट बंद आहे. यानंतर रेल्वे सुरळीत झाल्या असल्या तरी प्रवाशांना आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही.

परंतु, आता मुंबईकडे धावणाऱ्या आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम, नांदेड- मुंबई राज्यराणी आणि नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये विनाआरक्षण तिकिटाला शनिवारपासून (दि.१२) सुरुवात झाली आहे. मुंबईकडून येणाऱ्या या रेल्वेंसाठी विनाआरक्षण तिकीट या महिन्याखेर मिळण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

खासदार हेमंत गोडसे, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याबाबतही यावेळी मागणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाचा निर्णय प्रवाशांसाठी सकारात्मक
रेल्वे प्रशासनाने तीन एक्स्प्रेसमध्ये सर्वसाधारण तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचे प्रवासी स्वागत करत आहेत. प्रशासनाने आता गोदावरी एक्स्प्रेस, इगतपुरी- भुसावळ शटल आणि नाशिक- भुसावळ पॅसेंजर त्वरित सुरू करावी. नरेंद्र खैरे

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
.