loader image
[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतनात शिक्षकांसाठी प्रशिक्षण

Mar 15, 2022


अँप्लीकेशन ऑफ रिमोट सेन्सीगं अँण्ड जी. आय. एस. इन सिव्हील इंजिनियरिंग या विषयावर मार्गदर्शन

श्री नेमिनाथ जैन ब्रह्रमचर्याश्रम संचालित श्री.एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतन अंतर्गत सिव्हील इंजिनियरिंग विभागातर्फै दोन दिवसीय राज्यस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनामधिल सिव्हील विभागातील शिक्षकांनी सहभाग घेतला या प्रशिक्षणात तज्ञ व्याख्याते प्रा.डॉ. संतोष भैलुमे असिस्टंट प्रोफेसर के.व्ही.एन. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, दिंडोरी यांनी अँप्लीकेशन ऑफ रिमोट सेन्सीगं अँण्ड जी. आय. एस. इन सिव्हील इंजिनियरिंग या विषयावर मार्गदर्शन केले. सुधुर संवेदन (रिमोट सेन्सीगं) आणि भौगोलिक माहिती प्रणालीचे स्थापत्य विभागातील अनुप्रयोग (अँप्लीकेशन) यावर ई-प्रणाली द्वारा भाष्य आणि प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यात जमिनीचा वापर आणि जमीन आच्छादनाचे मापन त्याच प्रमाणे A.R.C. GIS सॉफ्टवेअर चा वापर कसा करावा याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १४३ प्राध्यापकांना लाभ मिळाला, तसेच सहभागी प्राध्यापकांना ई-प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सिव्हील विभागातील प्राध्यापक व्ही.बी. राजनोर, डी.बी. पवार, के.के. काळे, समवेत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमासाठी विभागप्रमुख एस.एच. गौडा व प्राचार्य डॉ.व्ही.ए. वानखेडे. यांनी मार्गदर्शन केले.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री. बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा.श्री. दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री. अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा.श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा.श्री. राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले .


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.