Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो. च्या वतीने ना.आठवले यांना विविध मागण्यांचे निवेदन

Mar 16, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सामाजिक न्याय व राज्यमंत्री आयु.रामदास आठवले यांची दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.सदर शिष्टमंडळामध्ये झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य सुचित्रा गांगुर्डे,कारखाना शाखाचे उपाध्यक्ष सागर गरूड, प्रेमदिप खडताळे आदीचा समावेश होतो.
सदर निवेदन मध्ये महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांमध्ये
(१) सी.ई.टी.माध्यमांतून विविध कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.या प्रक्रियेत ऑल इंडिया कोटा,एन.आर.आय.कोटा., जम्मू काश्मीर कोटा आदी कोटा आहेत,या कोट्यामध्ये आरक्षण नाही.या मध्ये प्रवेशासाठी आरक्षण लागू करण्यात यावे.
(२) आंतरजातीय विवाह व आंतरधर्मीय विवाह साठी सरकार कडून पन्नास हजार प्रोत्साहन राशी दिली जाते,या राशी मध्ये वाढ करून दोन लाख करण्यात यावी.
(३) ग्रामीण भागात विविध स्पर्धा परीक्षा साठी अभ्यास केंद्रांची निर्मिती करण्यात यावी.
(4) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी सरकार कडून चार लाख रुपये प्रति एकर शेती साठी दिलें जाते,या रक्कमेमध्ये बाजारमुल्ये प्रमाणे वाढ करण्यात यावी.
(5)सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यां साठी विभिन्न शिष्यवृत्ती देण्यात येतात त्यांचे एकत्रीकरण करण्यात यावे.
(6) दिल्ली येथे लोकसेवा आयोगाच्या परिक्षा तयारी साठी अनुभवी क्लासेस मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी योजना राबवून त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदन येथे राहन्यासाठी सूट राखीव करण्यात यावे अथवा वस्तीगृह निर्माण करण्यात यावे.
(7) महाराष्ट्र सरकार बार्टी तर्फे स्पर्धा परीक्षा तयारीसाठी असलेली विद्यार्थ्यांची मर्यादा वाढवून 1000 करण्यात यावी.
(8) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देशातील आय आय एम(IIM) यांचेशी अनुबंध करून रोजगार विभिमुक विभिन्न कोर्सेस राबविन्यात यावेत.
(9) सामाजिक न्याय विभागा तर्फे रोजगार बाबत सूचना आणि सेवा केंद्र उभारण्यात यावेत.
10)सामाजिक न्याय विभागातर्फे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात यावे.
11) महिला बचत गटासाठी पुरवठाकामी सरकारी टेंडर प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे.
12) मागासवर्गीय उद्योजकान्ना भांडवल पुरवठाकामी 50 लाख सब्सिडी कर्ज देण्यात यावे.
आदी मागण्या निवेदनात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]