Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांकडून दुर्गुणांची होळी साजरी

Mar 17, 2022

नांदगाव येथील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून आवारातील झाडांचा पालापाचोळा प्लास्टिक व कागद यापासून तयार केलेल्या होळीचे दहन करून होळी सण साजरा केला. यात मुलांनी वाईट रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा,राग, द्वेष, मत्सर, आळस,मी पणा,गर्व, अंधश्रद्धा,अहंकार,वाईट गुण यांचे तक्ते बनवून त्यांचे होळीत दहन केले. श्रीमती चोळके मॅडम यांनी होळी या सणाविषयी माहिती सांगितली. नंतर त्याच पद्धतीने आपल्या मधील वाईट गोष्टी होळी च्या माध्यमातून समूळ नष्ट कराव्यात हा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ उपस्थित होते.
प्रशासन अधिकारी पी.पी. गुप्ता, चेअरमन सुनील कुमार कासलीवाल, श्री.विजय चोपडा, श्री.महेंद्र चांदिवाल या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, विजय जाधव,धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, जयश्री चोळके,अनिता पवार, वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

कपिलवस्तू बुद्धविहारात रविवारी वर्षावास कार्यक्रमाची सांगता ; होणार आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

कपिलवस्तू बुद्धविहारात रविवारी वर्षावास कार्यक्रमाची सांगता ; होणार आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

मनमाड - बुद्धवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात आषाढ ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने अखंड सुरू...

read more
फलक रेखाटन

फलक रेखाटन

दि. १५ ऑक्टोबर २०२२. माजी राष्ट्रपती ,भारतरत्न ,डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती. वाचन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]