loader image

अन्यथा सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

Oct 17, 2022

रोजंदारीवर कामाला असलेल्या संजय बहोत या रोजंदारी कर्मचाऱ्याला आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक म्हणून चार्ज दिल्याने सदर व्यक्ती मनमानी कारभार करत असल्याने त्याच्या जाचाला अनेक सफाई कामगार वैतागले आहे काम सोडून द्यावे की जीव द्यावा अशी स्थिती निर्माण झाली असून तात्काळ त्याच्या मूळ जागेवर पाठवण्यात यावे अन्यथा सर्व विभागातील स्वच्छतेचे साफसफाईचे काम बंद करण्याचा एल्गार सर्व सफाई कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या या व्यक्तीवर कोणता राजकिय वरदहस्त आहे याची चर्चा शहरात रंगली आहे.
मनमाड नगर पालिकेत रोजंदारी कर्मचारी काम करणारे कर्मचारी संजय बहोत यांची नेमणूक पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षक म्हणून केल्याने कामगार संतप्त झाले आहे सदर व्यक्तीने चार्ज घेतल्यापासून दहशत निर्माण केली असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे सदर व्यक्तीने मनमानी आणि हुकुमशाही पध्दतीने कर्मचारी, कामगारांवर दबाव आणून त्रास देण्याचे काम सुरू केले आहे हा त्रास इतका वाढला आहे की कामगार कामावर जातांना धास्ती धरून जात आहे कामावर गेल्यावर कामगारांना उध्दट भाषेत अरेरावी केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे कर्मचारी दोन पाच मिनीटे उशिर झाल्यास कामगाराचे खाडे मारले जातात, कामावर घेऊ नका, हजेरी मस्टरचे फोटो काढले जातात जणू कामगारांना कैद्याप्रमाणे वागवले जात असुन या जाचाला कंटाळून काम सोडून द्यावे की जीव द्यावा असा संतप्त भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. सदर व्यक्तीच्या मागे कोणता राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा देखील शहरभर रंगली होती. सदर व्यक्ती या पदावर राहिल्यास या व्यक्तींमध्ये आणि सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गंभीर प्रकार घडू शकतो त्यामुळे सदर व्यक्तीस त्याच्या रोजंदारीच्या मूळ जागेवर बदली करावी या मागणीसाठी आज मोर्चा काढत प्रशासन अधिकारी अशोक पाईक यांना निवेदन दिले निवेदनावर किशोर आहिरे, सूरज चावरीया, राजेंद्र धिंगाण, संतोष वानखेडे, मटरुलाल चुनियान, श्याम खलसे, सुरेंद्र सिलेलान, मिथुन धिंगाण, बाळू सकट, विजू धिंगाण, अमोल केदारे, यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व सफाई प्रमुख, कायम मुकादम, प्रभाग प्रमुख, मुकादम, सफाई कर्मचारी महिला व पुरुष आदींच्या सह्या आहेत सदर प्रकरणी कार्यवाही न झाल्यास ता १७ पासून शहरातील सर्व प्रभागातील स्वच्छतेचे, साफसफाईचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.