Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांकडून दुर्गुणांची होळी साजरी

Mar 17, 2022

नांदगाव येथील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून आवारातील झाडांचा पालापाचोळा प्लास्टिक व कागद यापासून तयार केलेल्या होळीचे दहन करून होळी सण साजरा केला. यात मुलांनी वाईट रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा,राग, द्वेष, मत्सर, आळस,मी पणा,गर्व, अंधश्रद्धा,अहंकार,वाईट गुण यांचे तक्ते बनवून त्यांचे होळीत दहन केले. श्रीमती चोळके मॅडम यांनी होळी या सणाविषयी माहिती सांगितली. नंतर त्याच पद्धतीने आपल्या मधील वाईट गोष्टी होळी च्या माध्यमातून समूळ नष्ट कराव्यात हा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ उपस्थित होते.
प्रशासन अधिकारी पी.पी. गुप्ता, चेअरमन सुनील कुमार कासलीवाल, श्री.विजय चोपडा, श्री.महेंद्र चांदिवाल या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, विजय जाधव,धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, जयश्री चोळके,अनिता पवार, वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

अंगणवाडी मनमाड विभाग येथे अँनिमिया कँम्पचे आयोजन नांदगाव तालुक्याचे आमदार माननिय श्री. सुहास आण्णा कांदे यांनी  दिली भेट

अंगणवाडी मनमाड विभाग येथे अँनिमिया कँम्पचे आयोजन नांदगाव तालुक्याचे आमदार माननिय श्री. सुहास आण्णा कांदे यांनी दिली भेट

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी मनमाड विभाग आणि उपजिल्हा...

read more
अंगणवाडी मनमाड विभागात करण्यात आली. मुलांची  आरोग्य तपासणी आणि गरोदर महिलानां मार्गदर्शन

अंगणवाडी मनमाड विभागात करण्यात आली. मुलांची आरोग्य तपासणी आणि गरोदर महिलानां मार्गदर्शन

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नासिक २ अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी क्र.८१...

read more
भगवान वीर एकलव्य व संत श्री सेवालाल महाराज यांच्या भव्य मूर्तींची होणार प्रत्येक तांडा आणि वस्तीवर स्थापना – आमदार कांदे करणार समाज बांधवांचा सन्मान

भगवान वीर एकलव्य व संत श्री सेवालाल महाराज यांच्या भव्य मूर्तींची होणार प्रत्येक तांडा आणि वस्तीवर स्थापना – आमदार कांदे करणार समाज बांधवांचा सन्मान

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे मतदार संघातील प्रत्येक घटकाचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]