नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे मतदार संघातील प्रत्येक घटकाचा विचार करत आहेत. याच विकास कार्याचा एक भाग म्हणून आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदार संघातील 81 आदिवासी वस्ती व 35 बंजारा समाज तांडा वस्ती येथे निधी अंतर्गत सभामंडप मंजूर केले आहेत. सुसज्ज अशा सभामंडपात वधू-वर कक्ष, स्वयंपाकघर अशा सुविधाही उपलब्ध असणार आहेत.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य तसेच संत श्री सेवालाल महाराज यांची भव्य आकर्षक संगमरवरी मूर्ती प्रत्येक तांडा आणि वस्ती वर भेट दिली जाणार आहे.
या सर्व मुर्त्यांचा सामूहिक मूर्तिपूजन व समाज बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून, यात प्रत्येक मूर्ती समोर 2 जोडपे पूजेस बसणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पुरोहित पूजा करणार आहे यामध्ये आदिवासी बांधवांच्या 165 जोड्या तर बंजारा समाज बांधवांच्या 75 जोड्या पूजेस बसणार आहेत. सुरुवातीला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्व समाज बांधवांना आदराने स्वागत करून आसनस्थ करणार आहेत, आमदार सुहास अण्णा कांदे तसेच मुख्य पदाधिकारी पूजेसाठी बसणार आहेत. यानंतर आलेल्या सर्व पाहुणे मंडळींसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
भगवान वीर एकलव्य मूर्ती पूजन व आदिवासी समाज बांधव सन्मान सोहळा
शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 वेळ सकाळी 10 वाजता
ठिकाण मार्केट कमिटी येवला रोड नांदगाव.
व
संत श्री सेवालाल महाराज मूर्ती पूजन व बंजारा समाज बांधव सन्मान सोहळा
रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता
ठिकाण मार्केट कमिटी येवला रोड नांदगाव
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुम सुहास कांदे यांनी केले आहे.