Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विविध मागण्यांसाठी सीआरएम एस चा मोर्चा

Mar 18, 2022

केंद्रीय इंजिनिअरिंग रेल्वे वर्कशॉपमध्ये कामगारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदुर संघ मनमाड शाखे तर्फे विशाल धरणे आंदोलन करून सहाय्यक मंडल अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रेल्वे वर्कशॉपमध्ये विविध शेड ची दुरुस्ती व शेड वरून होणारी गळती रोखावी, स्वच्छता गृहामधील पाण्याची पूर्तता तसेच विविध भागात असलेल्या रेल्वे कॉलोनी मध्ये नियमित पाणी पुरवठा करावा, घरांचे तुटलेले दरवाजे, चोकअप ची समस्या, ड्रेनेज लाइनची दुरुस्ती, भिंतीच्या टाइल्स दुरुस्ती आणि छात्रावास च्या बाजूला असलेल्या रेल्वे क्वार्टरची दुरुस्ती तसेच रेल्वे ओपन लाईन विभागातील कामगारांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणीचे निवेदन सहाय्यक मंडल अभियंता विशाल डोळस यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महेंद्र चोथमल यांनी सूत्रसंचलन केले.शशिकांत अडोळकर,गणेश हाडपे, प्रकाश बोडके,इरफान शेख,आनंद गांगुर्डे,नितीन पवार यांनी मनोगत व्यक्त केले.सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा व ओपन लाईन शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]