Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

Mar 18, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित , कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 14 मार्च 2022 रोजी दृक-श्राव्य माध्यमातून वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून जीवन विमा महामंडळाचे व्यवस्थापक श्री.अरुण सोनवणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील राहून प्रात्यक्षिक ज्ञान घेणे ही काळाची गरज आहे आणि विमा क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी आहेत असे सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही.पाटील यांनी भूषविले .याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर यांनी कोरोना काळात विम्याचे वाढलेले महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांनी या दृष्टिकोनातून प्रयत्नशील रहावे असे आव्हान केले .
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ.एस.डी.थोरे यांनी केले तर सूत्रसंचालन व अतिथी परिचय प्रा.श्रीमती ए.एस. छाजेड यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. व्ही. एस. नजरधाने यांनी केले .
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे , कुलसचिव समाधान केदारे , प्रा.एस.ए. मुसळे यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली व कार्यक्रम यशस्वी केला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]