Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वंचित बहुजन आघाडी नगरपरिषद निवडणुकीत जोमाने उतरणार : ॲड.आम्रपाली निकम

Mar 19, 2022

येत्या काळात होणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व ३३ जागा वंचित बहुजन आघाडी लढविणार असून शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा,सुयोग्य आरोग्य व वाहतुक व्यवस्था आदी प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी लक्ष केंद्रित करणार असल्याचे प्रतिपादन पक्षाच्या नवनियुक्त अध्यक्षा ॲड. आम्रपाली निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका विषद केली.प्रत्येक वॉर्ड, प्रभागात पक्ष बांधणी करून वंचित बहुजन आघाडीच्या शाखा सुरू करणार आल्याचे त्या म्हणाल्या.विधानसभा निवडणुकीत पक्षाला तालुक्यातून ८५०० मते मिळाली होती व ती मते आमच्या हक्काची आहेत व ती आम्हालाच मिळणार असा आशावाद ही त्यांनीं बोलून दाखविला. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा चांगले रस्ते, योग्य आरोग्य व्यवस्था, सुरळीत पाणीपुरवठा यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच भ्रष्टचार,गैर व्यवहार, निकृष्ट दर्जाची कामे झालेली असून सध्या सुरू आहेत या विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे पक्षात सुशिक्षित आहे अशांना नेतृत्व करू दिले जात नाही, त्यांना यापुढे वंचित मध्ये संधी दिली जाईल. उपजिल्हा रुग्णालय,महावितरण या संदर्भातील समस्या तसेच अपूर्णावस्थेत असलेले सावित्रीबाई फुले मार्केट व स्टेडियम चे काम तसेच नवीन रस्त्यांची कामे या मुद्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्या म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला जिल्हा सचिव कादिर शेख,जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, शहर महासचिव कैलास गोसावी,शहर सचिव अनवर मन्सुरी, शहर उपाध्यक्ष गणेश एलिंजे,अमोल केदारे,राकेश पगारे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

डीबीटी पोर्टलवरील चालू  शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्या : अध्यापकभारती

डीबीटी पोर्टलवरील चालू शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्या : अध्यापकभारती

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती- शिक्षण...

read more
गोदावरी एक्स्प्रेस च्या जागी सुरू केलेली समर स्पेशल गाडी २८ मे पासून २ जून पर्यंत रद्द

गोदावरी एक्स्प्रेस च्या जागी सुरू केलेली समर स्पेशल गाडी २८ मे पासून २ जून पर्यंत रद्द

मनमाडहून – मु्ंबईला जाणारी ०२१०२ व ०२१०१ हॉलिडे स्पेशल ट्रेन ( गोदावरी एक्स्प्रेस च्या वेळेवर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]