Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे २७ मार्च रोजी आयोजन

Mar 21, 2022

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषिजी म.सा. यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त व स्व.डॉ.सी.एच. बागरेचा यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त रविवार दिनांक २७ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री आनंदऋषिजी म. सा. यांचा ३० वा स्मृतिदिनानिमित्त पेनरोज हेल्थकेअर प्रा. लि. नाशिक रुग्णालय व श्री आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या सहकार्याने स्व.सी.एच. बागरेचा यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त दि.२७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जैन भवन,कोर्ट रोड येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मधुमेह, मेंदूचे व मणक्याचे आजार, पोटाचे विकार, याविषयी मार्गदर्शन व सल्ला, अल्प दरात ई.सी.जी.,अल्पदरात रक्त तपासणी,मासिक पाळीच्या संदर्भातील उपचार व मार्गदर्शन, पी.सी.ओ.डी. निदान, वंध्यत्व निवारण व सल्ला, कुटुंब नियोजन व सल्ला,स्त्री रोग कॅन्सर निदान विषयी तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. प्रवीण शिंगी, डॉ.अजय भन्साळी. डॉ.सौ.निधी भन्साळी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. नावे नोंदणीसाठी डॉ. आकाश जैन ९९७०१३५२७७, डॉ.निलेश राठी ९७६६५२८४६६, डॉ.नितीन जैन ९२७०१४७६००, अनुप बेदमुथा ९४२०४२७७४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून शिबिर यशस्वितेसाठी श्री.आनंद धर्मार्थ दवाखाना, श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ, जय आनंद युवा मंच, श्री जैन श्रावक संघ यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्यांच्या वारसांना मिळणार सहाय्यता निधी !

राज्याच्या इतिहासात एक वेगळे आणि शिस्तबद्ध आंदोलन म्हणून स्थान निर्माण केलेल्या मराठा आरक्षणासाठी...

read more

जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा : ओबीसी आरक्षणावरून भुजबळांचा केंद्रावर हल्लाबोल !

आपल्या खास शैलीतील शेरोशायरी साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी आज देखील...

read more

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली सिलेंडर स्फोटाने हताहत झालेल्या तांबोळी परिवाराची भेट : मदतीचे आश्वासन !

शुक्रवार (दि.26) रोजी खाकीबाग येथे अश्पाक तांबोळी यांच्या घरात गॅस सिलेंडरने पेट घेऊन आग लागली....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]