Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अशोक क्रीडा मंडळ आयोजित फिरता चषक कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाने पटकविले विजेतेपद

Mar 21, 2022

अशोक क्रीडा मंडळ आयोजित फिरता चषक कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाने सम्राट क्रीडा मंडळाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर नवयुवक क्रीडा मंडळाने तृतीय पारितोषिक पटकाविले तसेच सांस्कृतिक क्रीडा मंडळाला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले.
बुधलवाडीच्या बु.युवराज भिकाजी पगारे क्रीडा नगरीमध्ये दिवस कबड्डीचा थरार रंगला होता.22 संघांनी या स्पर्धेत सहभागी नोंदविला होता.उपांत्य फेरीत सम्राट क्रीडा मंडळाने नवयुवक तर मनमाड बॉईजने सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा पराभव केला.चुरशी झालेल्या अंतिम सामन्यात मनमाड बॉईजने सम्राट क्रीडा मंडळाचा पराभव केला.यावेळी स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू ,मॅन ऑफ मॅच , उत्कृष्ट चढाई ,उत्कृष्ट पकड व सर्वात्कृष्ठ खेळाडूंना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे ,माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक ,जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाह मोहन अण्णा गायकवाड ,डॉ.शरद शिंदे ,सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी बु.राजेंद्र अंकुश ,सुभाष अंकुश व करण अंकुश यांच्या स्मरणार्थ मिलिंद अंकुश यांच्यावतीने अशोक क्रीडा मंडळाच्या माजी खेळाडूंचा गौरव करण्यात आला.अशोक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशोक गरुड ,अरुण अंकुश ,गणेश केदारे आदींसह अशोक क्रीडा मंडळाच्या आजी -माजी खेळाडूंनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]