Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात इंटर्नशिप बाबत मार्गदर्शन सूचना – कार्यशाळा संपन्न

Mar 23, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , मनमाड येथे दिनांक 23 मार्च 2022 रोजी दृकश्राव्य माध्यमातून वाणिज्य विभागातर्फे “इंटर्नशिप सूचना मार्गदर्शन” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी प्रा.उदय टेके सर एम. एस. जी महाविद्यालय,मालेगाव हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन असे सांगितले की, ” कौशल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी इंटर्नशीप हा महत्त्वाचा घटक आहे ” . कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांनी भुषविले. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.भोसले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस.डी .थोरे यांनी केलेअसून त्यांनी , “शिक्षक हा शिक्षणासाठीची”द्वारे उघडी करून देऊ शकतो, पण विद्यार्थ्यांनी त्यात प्रवेश करणे ही विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी आहे असे,वक्तव्य केले.सुत्रसंचालान व अतिथी परिचय प्राध्यापिका श्रीमती.ए.एस छाजेड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.व्ही.एस.नजरधने यांनी मानले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य डॉ.प्रमोद आंबेकर, डॉ.थोरात,डॉ.इंगळे, पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, कुलसचिव समाधान केदारे, डॉ.मिलिंद अहिरे,डॉ. शेंडगे, प्रा.एस.ए मुसळे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम यशस्वी केला.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]