Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात शहीद दिन साजरा : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीय
प्राचार्य डॉ अरुण पाटील

Mar 23, 2022


म.गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक 23 मार्च 2022 रोजी शहीद दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या अतुलनीय त्यागाने ते अजरामर झाले. सरदार भगतसिंग, पंडित सुखदेव, शिवराम हरी राजगुरू, चंद्रशेखर आजाद यांना कोणतीही भारतीय व्यक्ती कदापि विसरू शकणार नाही. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी मांडले.
याप्रसंगी आपल्या मनोगतातून प्रा एन डी पगार यांनी भारतीय क्रांतिवीरांची पराक्रम गाथा अत्यंत स्फूर्तिदायक व चित्तथरारक होती असे मत मांडले.
याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर, कुलसचिव श्री. समाधान केदारे, कार्यालयीन अधिक्षक श्री एकनाथ अहिरे, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]