loader image
[ays_poll id=7]

कवी प्रकाश होळकर यांची साहित्य महामंडळावर बिनविरोध निवड

Mar 26, 2022

प्रसिद्ध कवी, गीतकार प्रकाश होळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. कवी प्रकाश होळकर यांच्या निवडीने हा बहुमान नाशिक जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे. फलटण जिल्हा सातारा येथे सत्तावीसावे विभागीय साहित्य संमेलन नुकतेच थाटात संपन्न झाले. आणि याला जोडूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे या संस्थेची बैठक कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याबैठकीस मसापचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, व इतर वीस मान्यवर सदस्य या बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला अटीतटीच्या वाटणाऱ्या, या बैठकीत कवी प्रकाश होळकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आला. होळकर यांची अखिल भारतीय साहित्य महामंडळावर बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या इतिहासात प्रथमच नाशिक जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. नाशिकला संपन्न झालेल्या संमेलनातील वाद-विवाद अजून सुरूच आहे. तेव्हा प्रकाश होळकर यांच्या निवडीने अधिक लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग समितीच्या सदस्यपदी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदी प्रकाश होळकर यांची निवड नुकतीच झाली आहे. त्यामुळे साहित्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी प्रकाश होळकर यांचे अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.