Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुरुकुल पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज नांदगाव येथे आज नोकरी मेळाव्याचे आयोजन

Mar 29, 2022

नांदगांव येथील गुरुकुल पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या माध्यमातून नांदगाव तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नोकरी मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले आहे.
गुरुकुल पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज नांदगावच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना नाशिक ,औरंगाबाद ,गुजरात येथील कंपनी मध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
गुरुकुल मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नोकरी लावून देण्याच्या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुसळगाव सिन्नर नाशिक येथील रिंग प्लस ॲक्वा लिमिटेड या कंपनीसा 100 जागां भरतीसाठी या मेळाव्यात मुलांची निवड करण्यात येणार आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा काळाततील दीड ते दोन वर्ष अनेक व्यवसाय ठप्प झाले नोकऱ्या बंद झाल्या होत्या गेल्या तीन-चार महिन्यांपासून व्यवसाय पूर्ववत होत असून अनेक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत . अशा परिस्थितीत आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक विद्यार्थ्यांनी नोकरीचा लाभ मिळावा म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार कांदे यांनी केले आहे
या मेळाव्यास महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेलचे सरचिटणीस रवींद्र देवरे, रिंकू प्लस एक्वा लिमिटेड कंपनीची सिलेक्शन टीम तसेच गुरुकुल पॉलीटेक्निक व आयटीआयचे प्राचार्य याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत,

अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]