Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भीमोत्सव २०२२ या प्रबोधनात्मक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहा  दिवसांचा उत्सव साजरा होणार

Mar 29, 2022

शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या व्यक्ती संघटना संस्थांनी एकत्र येत भीमोत्सव २०२२ या प्रबोधनात्मक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला सहा  दिवसांचा उत्सव साजरा करणार आहेत विशेष म्हणजे पावती पुस्तकेला, वर्गणी गोळा करण्याला फाटा देत उपस्थितांनी स्वतः योगदान देत पैसे जमा केले यामुळे जयंती उत्सवात हा उपक्रम आदर्श ठरणार आहे

मनमाड शहरात साजरा होणारा जयंती उत्सव हा राज्यात प्रसिद्ध आहे उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येतात एक विचारात्मक चळवळ उभी रहावी यासाठी शहरातील फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या व्यक्ती संस्था संघटनांनी एकत्र येत येथील पालिकेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक घेतली आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमोत्सव २०२२ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले यावेळी उपस्थितांनी स्वइच्छेने स्वतः पैसे जमा केले अनेकांनी पैसे देण्याचे कबूल केल्याने एक नवा पायंडा पडला आहे
या भीमोत्सवात विचारवंतांची व्याख्याने, शाहिरी, जलसा, भीमगीते, स्पर्धा आदींसह विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अध्यक्ष अथवा कार्यकारणी न निवडण्याचा मागील निर्णय पुढेही कायम ठेवण्यात आला भीमोत्सव आयोजन समितीचे कोषाध्यक्ष अमोल खरे यांनी मागील २०१९ च्या भीमोत्सवाचा जमाखर्च सादर केला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली यावेळी भीमोत्सव समितीचे दिनकर धिवर, अमोल खरे, डॉ जे वाय इंगळे, सतिष केदारे, फिरोज शेख, निलेश वाघ, अमीन शेख, रत्नदीप पगारे, प्रदीप गायकवाड, रामदास पगारे, संतोष भोसले, पापा थॉमस, एड सागर गरुड, संजय भालेराव, अर्जुन साळवे, सुरेश आहिरे, अनिस पठाण, संतोष भोसले, सागर शिरसाठ, राजू गायकवाड, सद्दाम अत्तार, यशवंत बागुल, अशोक बिदरी, योगेश म्हस्के, अफरोज अत्तार, सुनील साळवे, विक्की सूरवसे, पंकज जाधव, विजय उबाळे, दादा शार्दूल, शिरीष पगारे आदींसह मोठ्या संख्येने आंबेडकरी विचारांचे नागरिक उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]