मनमाड येथील प्रसिद्ध गांधी हॉस्पिटल तर्फे नांदगाव येथे काल ३१ मार्च रोजी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदगाव चे माजी नगराध्यक्ष बबी काका कवडे आणि मनमाड चे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत १०८ मुनी चंद्रसागर दिगंबर जैन धर्मात औषधालय येथे शिबिर संपन्न झाले. नांदगाव शहरातील सर्व डॉक्टर्स व केमिस्ट बांधव यांचे मोठ्या प्रमाणात या शिबिरात सहकार्य लाभले. हृदयरोगतज्ञ डॉ.सोनल गांधी व डॉ.जितेंद्र गांधी यांनी उपस्थितांचे स्वागत करून नांदगाव शहरात अखंडपणे वैद्यकीय सेवा दिली जाईल असे सांगितले. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात उपचार ही या शिबिरात करण्यात आले. यावेळी मंगेश सगळे, धनेश मगर, गणेश वहाळे, प्रतीक देवरे, सिद्धांत पाटील यांसह नांदगाव व मनमाड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात साजरा.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे स्वातंत्र्यदिनी संस्थेचे सदस्य अजीमभाई...