loader image
[ays_poll id=7]

सरकारकडून एक शेतकरी एक डीपी 2022 योजना; प्रति एचपी लागणार फक्त इतके रुपये..!

Apr 1, 2022

राज्यात गेल्या 2 वर्षांपासून पाऊसमान चांगले आहे. मात्र, वीज नसणे, डीपी (रोहित्र) जळणे, डीपी वरील वीज वाहिनी तोडणे अशा विविध समस्यांमुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही ते पिकांना देणे अशक्य झाले आहे. एकच डीपीवरून अनेक शेतकऱ्यांना कनेक्शन असल्याने मोजक्या शेतकऱ्यांनी वीज बिलाचे पैसे भरूनही त्यांनाही वीज मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने एक शेतकरी एक डीपी 2022 योजना आणली आहे. यामुळे नियमीत वीज बील भरणाऱ्या शेतकऱ्यांना वीजही नियमीत मिळेल.

इतक्या हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ..
आता राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये या सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक अडचणी कमी होणार आहेत. आतापर्यंत या योजनेचा ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. तसेच अनेक शेतकरी लाभ घेण्यासाठी अर्ज करीत आहेत.

राज्याकडून ११ हजार कोटींची निधी..
राज्य सरकारने या योजनेसाठी ११३४७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये विद्युत पुरवठामध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ, विद्युत अपघात अशा घटनांचा समावेश आहे.
त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणालीद्वारे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे.

प्रति एचपीसाठी लागणार इतका खर्च..
ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति एचपी ७,००० रुपये द्यावे लागतील. अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५,००० रुपये द्यावे लागतील. यासाठी आधार कार्ड, मोबाइल नंबर, शेताचे ७/१२ प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक लागणार आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.