loader image
[ays_poll id=7]

आज मराठी नवं-वर्ष प्रारंभ….”गुढीपाडवा”

Apr 2, 2022


गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. मराठी नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो.संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभुषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत दरवर्षी केलं जातं.

मनमाड शहरात यंदाच्या वर्षी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला , नागरिकांनी सकाळी आपल्या घरावर गुढ्या उभारून , रांगोळ्या काढुन नवीन वर्षाचे स्वागत केले.मनमाड येथील प्रसिध्द चित्रकार श्री साहिल साळसकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सुंदर अशी रांगोळी काढुन गुढीपाडवा साजरा केला.गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते. गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुडी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
.