Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी : उच्च न्यायालयात याचिका दाखल

Apr 5, 2022

सुमारे दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून रेल्वे विभागाने रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या. टप्प्याटप्याने आतापर्यंत ९५% गाड्या ह्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या असून रेल्वे प्रशासनाकडून अद्याप पावेतो मनमाडकर चाकरमान्यांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी यांच्या साठी सोयीची असणारी मनमाड – कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस अजूनही सुरू न करता ही गाडी कायम स्वरुपी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाचा असल्याचा विविध प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. याच अनुषंगाने मनमाड येथील गोदावरीचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट ने पुढाकार घेत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनमाड, लासलगाव,निफाड,नाशिक, इगतपुरी,कसारा, कल्याण सह मुंबई येथे जाणाऱ्या व्यापारी,विद्यार्थी, चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहे.अनेक वेळा रेल्वे महाप्रबंधक, लोकप्रतिनिधी तथा विविध अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन, पत्रव्यवहार, पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. उत्पन्नाचे कारण रेल्वे प्रशासनाकडून पुढे करण्यात येत असून ती सुरू होईल का नाही ह्या संदर्भात कोणीही छातीठोक पणे सांगू शकत नाही. उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतनिधींनी याची तातडीने व गांभीर्याने दखल न घेतल्यास गोदावरी एक्स्प्रेस ही कायमची बंद होऊ शकते.त्यामुळेच उच्च न्यायालयात ॲड.चेतन सुभाष डमरे यांच्या सहकार्याने गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती गोदावरीचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट चे नरेंद्र खैरे यांनी दिली आहे मुंबई उच्च न्यायालयात एचसीबीएम ०१०१२२७९२०२२ याद्वारे याचिका दाखल केली असून लवकरच सुनावणी होईल असे नरेंद्र खैरे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]