Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडला वीज कंपनी विरोधात मध्यरात्री सर्वपक्षीय आंदोलन

Apr 8, 2022

शहर परिसरात उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचल्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढवून विजेचा तुटवडा होत असल्याने वारंवार विज खंडीत होत आहे. गेल्या आठ दिवसापासुन विज महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पणे दररोज दीड ते दोन तासाचे तातडीचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाच नागरिकांना मात्र जीव कासावीस होत आहे.त्या अनुषंगाने मध्यरात्रीच्या सुमारास सर्वपक्षीय संघटनेने तब्बल दीड तास शहरातून जाणाऱ्या इंदोर – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.यावेळी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजीही देण्यात आली. यंदाच्या उन्हाळ्यात मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरूवातीला तापमानाचा पारा 40 आमच्या पुढे गेल्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच सातत्याने खंडित वीज पुरवठा मुळे शहरवासीय हवालदिल झाले आहेत. बुधवार रात्री साडेअकराच्या सुमारास मनमाड शहर पूर्ण ब्लॅकआऊट झाले आणि नागरिकांच्या हालअपेष्टाना पारावर उरला नाही वातावरणात हवेचा थांगपत्ता नाही तर घरात उकडणे बसवेना त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची अवस्था मनमाडकरांचे झाली. यातच वीज मतावितरण कंपनीने दिवसभरातून कधीही तातडीचे भारनियमन शहरात सुरू केल्याने नागरिकांच्या हाल अपेष्टांमध्ये अधिकच भर पडली आहे. या रास्ता रोको मध्ये शिवसेना,राष्ट्रवादी,भाजपा, रिपाई आणि मनसे आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.राजेंद्र आहिरे, राजेंद्र पगारे,मयुर बोरसे,नितीन पांडे,जयकुमार फुलवाणी, नाना शिंदे, अक्षय देशमुख,गुरुकुमार निकाळे,सचिन शिरुड, सिद्धार्थ निकम, योगेश इमले,प्रितम गायवाड,भगवान भोसले आदी सर्वपक्षीय पदाधिकारी व मोठ्या संख्येने मनमाडकर या रास्तारोको मध्ये सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]