म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म. फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एन. डी. पगार यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे समस्त बहुजन भारतीयांना शिक्षित करणारी विज्ञाननिष्ठ विद्यापीठ होय. वर्णव्यवस्थेवर आधारलेली विषमतावादी समाजरचना समाजाच्या विकासासाठी घातक आहे. महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते होते.तसेच बहुजनांना शिक्षित करण्याचे मोठे काम ज्योतिबा फुले यांनी केले असे विचार एन. डी.पगार यांनी मांडले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री एकनाथ अहिरे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
१९८ अन्नदेवता शेतकरी बंधू भगिनींना कृषी पुरस्कार प्रदान !
कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९८ अन्नदेवता शेतकरी बंधु-भगिनींचा आज नाशिक येथील आरोग्य...











