Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

May 1, 2022

म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक1 मे 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी आपल्या अध्यक्ष मनोगतातून प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयी माहिती सांगितली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रखर असे आंदोलन उभारण्यात आले या प्रसंगी अनेकांना त्यात हौतात्म्य पत्करावे लागले. अनेक नेते, साहित्यिक, विविध संघटना,पत्रकार हे नवमहाराष्ट्र साठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले.इत्यादी विचार त्यांनी मांडले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभागाचे क्रीडा संचालक डॉ कराड यांनी केले याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य प्रा पी.के. बच्छाव व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्योती पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]