Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

समीर समदडीया यांची सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती सदस्यपदी नियुक्ती

Apr 11, 2022

समीर समदडीया यांची सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती सदस्यपदी नियुक्ती भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया यांची सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून सोलापूर ते येवल्यापर्यतच्या विविध समस्यां मांडून त्यांची सोडवणूक करण्याचे काम समदडीया यांना करता येणार आहे.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाद्वारा रेल्वे विभागीय समिती पुनर्गठन कार्यक्रम अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या शिफारशी वरून हि नियुक्ती करण्यात आली आहे. समदडीया हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असून विविध राजकीय व सामाजिक घडामोडीत त्यांचा मोलाचा सहभाग असतो.सोलापूर रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी नुकतेच समदडीया यांना निवडीचे पत्र दिले.येवल्यासह या भागातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण,दौंड-पुणे कॉडलाइन,दौंड- मनमाड मार्गाचे विद्युतीकरण,विविध गाड्यांना नगरमध्ये थांबा मिळवून देणे, स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रवाशांना विविध सोयी सुविधा मिळवून देणे, शिर्डी येथे भारतभरातून साईभक्त दर्शनासाठी येत असल्याने या ठिकाणी येणार्या यात्रेकरूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,कांदा व पैठणीची बाजारपेठ असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस तसेच साईनगर शिर्डी दादर एक्स्प्रेसला येथे थांबा मिळावा आदि कामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे समदडीया यांनी सांगितले.
समदडीया यांचे या नियुक्तीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार,माजी पालकमंत्री गिरीश महाजन,भाजपाचे संगठन महामंत्री रवि अनासपुरे,जिल्हाध्यक्ष केदा आहेर,जिल्हा संगठन महामंत्री प्रा.सुनील बच्छाव,डी.के.जगताप,प्रकाश दायमा,जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार, जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांनी अभिनंदन केले.आज निवडीची घोषणा होताच येथे शिंदे पाटील फौंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक गणेश शिंदे,माजी नगराध्यक्ष बंडू शिरसागर, भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष मयूर मेघराज,ओबीसी मोर्चा सरचिटणीस राजूसिंग परदेशी, सरचिटणीस बापू गाडेकर यांनी पेठा भरवत त्यांचा सत्कार केला.

”विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला असून विविध सामाजिक कामांसाठी थेट मंत्रालयापर्यत वेळोवेळी पाठपुरावा करत आलो.या कामाची दखल झाली असून माजी पालकमंत्री गिरीश महाजन व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यामुळे मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.या भागातील रेल्वे प्रवाशांचे अनेक प्रश्न असून ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.”
-समीर समदडीया,सदस्य,सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती

अजून बातम्या वाचा..

एस.टी.कर्मचारी आंदोलन : विलीनीकरणाच्या मागणी वर ठाम – आज निर्णय होण्याची शक्यता !

राज्य शासनाने इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केल्यानंतर सुध्दा कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर...

read more

एस.टी.कर्मचारी आंदोलन : विलीनीकरण तूर्तास नाही परंतु इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ !

गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असेलेले एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आज परिवहन मंत्री अनिल परब...

read more

ॲमेझॉनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : मनमाड टिम केट व व्यापारी महासंघाची मागणी !

अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉन यांनी ऑनलाईन माध्यमातून नशिली पदार्थाचे विक्री केली त्याबद्दल...

read more

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक : कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

आज मोदींच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत कृषी कायदे मागे...

read more

अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री निलमणी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more

शाळेची शैक्षणिक ऋणमुक्ती म्हणून स्व:खर्चाने केले रंगकाम व कार्यालयाचे नुतनीकरण!

मनमाड येथील छत्रे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी सुदर्शन वाल्मिक दराडे यांनी शाळेची शैक्षणिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]