Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Apr 14, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी ज्ञानसूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट विषयी माहिती दिली. त्यानी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ” हा संदेश दिला. गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. न्याय, समता, मूलभूत हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य अशा विविध पैलूंचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करून जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाची निर्मिती केली. व त्या आधारावर भारत हा समृद्ध लोकशाही राष्ट्र म्हणून आजपर्यंत उभा आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्या ज्योती पालवे, कार्यालयीन अधीक्षक एकनाथ अहिरे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी. बी परदेशी यांनी केले. तर या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व प्रसिद्धी विभाग यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]