Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रभाग क्र.४ मधे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Apr 14, 2022

विवेकानंद नगर मध्ये भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भन्तेजी दिपंकर यांनी वन्दना व महीती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. श्रीराम चौधरी होते.तसेच प्रभाग क्र.४ स्वामी विवेकानंद नगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,नगर ,सिद्धार्थ कॉलनी माऊली नगर मधिल बांधव माता भगिनी व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भगवान गौतमबुद्ध छत्रपती शिवाजी महराज प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करण्यात आले व प्रा. श्री मुसमुंड़े सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय शिवाजी जय भवानी अशा घोषणांनी वातावरणात उत्साह संचारला. डॉ.बाबासाहेबंची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. आजच्या तरुण पिढीने टीव्हीवरील कलाकारांचा आदर्श डोळ्यापुढे न ठेवता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाज कार्य करावे. असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अध्यक्ष चौधरी यांनी प.पू.डॉ.बाबासाहेबंचे विचार सर्वांनी अमलात आनले पाहिजे आपल्याला बाबासाहेबंचा अभिमान वाट्ला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना मा. विभाग प्रमुख श्री शैलेश सोनवणे व सौ.शिल्पा शैलेश सोनवणे यांनी केले
कार्यक्रमाला भालेराव काकु,आहिरे काकु, केदारे काकु,केदारे वहिनी,जाधव काकु,दिवटे माऊशी, श्रीराम चौधरी, दिलीप संगपाळ,प्रविण कांबळे,आहिरे काका,नटेश गरुड,दादू केदारे,पगारे बाबा, बिडगर नाना,
अशोक शिंदे, नटेश गरुड, घनश्याम जाधव, शिरीष सोनवणे,प्रभाकर जाधव, हरिभाऊ देवरे,रविभाऊ निकम,वंदेष गांगुर्डे,गोरख चौधरी,क्रांती आव्हाड, विनायक बापट, औशिकर आप्पा, गवळी आप्पा, सुभाष राऊत,
जाधव दादा, भास्कर शिरसाठ,भालेराव काका, मुसमुंड़े सर, राहुल जाधव, कुणाल सोनवणे,गौरव सोनवणे,दिणेश सोनवणे, पठाडे काका, शिवाजी बिड्गर, भोसले तात्या,नानाजी पगारे, तसेच आदी मान्यवर मोठ्या सन्खेने उपस्थित होते…

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]