Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बाणगांव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी तेज कवडे तर व्हा.चेअरमनदी अभिमान कवडे यांची बिनविरोध निवड

Apr 16, 2022

नांदगांव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी  बाजारसमितीचे सभापती तेज प्रकाश कवडे तर व्हा.चेअरमनदी अभिमान कवडे यांची बिनविरोध निवड झाली.
बाणगाव येथील श्री बाणेंश्वर मंदिराच्या परिसरात निवडणूक निर्णय अधिकरी तथा सहायक सहकार अधिकारी लक्ष्मण गमे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अध्यक्ष पदासाठी विहित मुदतीत तेज प्रकाश कवडे तर उपाध्यक्ष पदासाठी अभिमान सिताराम कवडे यांचा प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण गमे यांनी दोन्ही पदासाठी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याचे घोषित केले अध्यक्ष पदासाठी तेज कवडे यांना सूचक म्हणून संदीप कवडे तर अनुमोदक म्हणून वसंत कवडे यांनी स्वाक्षरी केली उपाध्यक्ष पदासाठी अभिमान कवडे यांना सूचक म्हणून शांताराम काका कवडे तर अनुमोदक म्हणून जयराम जाधव यांनी स्वाक्षरी केली. 
बाणगांव बुद्रुक विविध कार्य सेवा सोसायटी ची स्थापना १९२६ साली झाली सुरवातीला टाकळी, भौरी, बाणगांव अशी गावे मिळून सोसायटी चे कार्यक्षेत्र होते आता बाणगांव बुद्रुक सोसायटी चे कार्य क्षेत्र स्वतंत्र झाले आहे या सोसायटीने आर्थिक परीस्थितीत प्रगती केली आहे स्थापने पासून ते आज पर्यंत कर्ज वसूली १००℅आहे  गेली ५० वर्षा पासून  बापुसाहेब कवडे संस्थेचे अध्यक्ष होते .यावेळीही बांणगाव बुद्रुक सोसायटी चा इतिहास नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखीत झाला संस्थेची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षे प्रमाणे बिनविरोध झाली होती व चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध झाली .
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे, एकनाथ सदगीर, रमेश गोराडे, वसंत कवडे, संदीप कवडे यांनी मनोगत व्यक्त केले निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मण गमे  सहायक सहकार अधिकारी व सचिव सजंय फणसे यांनी काम पाहिले या निवड प्रसंगी संचालक शांताराम काका  कवडे ,प्रभाकर कवडे,मच्छिद्र कवडे, वसंत कवडे, अशोक कवडे,संदीप कवडे, भावराव देवकर, जयराम जाधव भगवान कोळेकर राजुबाई कवडे, मैनाबाई आहेर,  यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब हिरे नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एकनाथ सदगीर, कैलास पाटील, उपसरपंच नारायण कवडे,सुनिल कवडे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शांताराम पाटील माजी सरपंच मोहनराव कवडे, भाऊसाहेब कवडे, चांगदेव देवकर, माणिकराव आहेर, कैलास गायकवाड, विलास गायकवाड, विक्रम फोडसे सचिव बाळासाहेब पवार, सुधाकर कवडे, अतुल कवडे, रवींद्र देवकर, किशोर आहेर, प्रमोद घोडके,आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान च्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त शहरातून पदयात्रा

श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान च्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त शहरातून पदयात्रा

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थानच्या धारकऱ्यानी १५ ऑगष्ट...

read more
नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम

नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम

नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने  आयोजित शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन...

read more
बघा व्हिडिओ – ग्रामसेविका एस,एस खडाख यांच्या मनमानी कारभारच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन

बघा व्हिडिओ – ग्रामसेविका एस,एस खडाख यांच्या मनमानी कारभारच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावातील ग्रामसेविका एस. एस. गडाख यांच्या...

read more
शिंगवे येथे दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या शुभहस्ते ध्वजारोहण

शिंगवे येथे दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या शुभहस्ते ध्वजारोहण

चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये प्रथम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]