श्री गणेश ज्वेलर्स मनमाड चे संचालक मा. सुनील जी भंडारी व सौभाग्यवती सौ पवनबाई सुनील भंडारी यांच्या ४० व्या लग्नाच्या वाढदिसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत भंडारी परिवाराने सहपरिवार मनमाड जवळील मनमाड उमराणे रोड येथील सेवा संकल्प गोशाळा व दिव्यांग समूह कुंभार्डे यांना भेट दिली .श्री ललितभाऊ भंडारी व जयेशभाऊ भंडारी यांनी आपल्या आई वडीलाच्या ४० व्या लग्नाचा वाढदिवस गो शाळेत गो मातेच्या सानिध्यात साजरा केला .दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात गो मातेसाठी चाऱ्याची उपलब्धता अल्प असते. आपली ही गो माते प्रती जबाबदारी लक्षात घेता ,आपण ही मदतीचा हातभार लावावा अशी इच्छा भंडारी कुटुंबीयांची होती.भंडारी कुटुंबांनी गो शाळेतील गो मातेसाठी ४ टन चारा उपलब्ध करून दिला . या आनंदी प्रसंगी कुटुंबातील लहान मोठ्यांनी गो सेवेचा आनंद घेत गो शाळेचे प्रमुख श्री महेश भाऊ चीमनपुरे उमराणे व देवरे मॅडम यांनी गोशाळा व समूहाच्या विषयी माहिती देत सर्व भंडारी परििवाराचे आभार व्यक्त केले व या पुढे ही आपण अशीच गो मातेसाठी मदत करावी .तसेच समाजतील सर्वांनी असेच पुढे येऊन गो शाळेला मदत व गो मातेची सेवा करावी असे आवाहन केले . या आनंदी प्रसंगी सौ.दीप्ती ललित भंडारी ,सौ.पुनम जयेश भंडारी ,केतन देवरे , कुवर सर,अनिल शिंदे, लखन जगताप आदी उपस्थित होते.
बाजार समिती सभापती दीपक गोगड यांच्या प्रयत्नांना यश – १६०० शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान
मनमाड - महाराष्ट्र राज्य शासनाने ( - ३१ मार्च २०२३ या - कांदा विक्री करणाच्या - रु.३५०/- (२००...











