Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

देखना है कल..तोह चलाओ सायकल, स्वामिनी सायकलिस्ट क्लब चे उद्घाटन संपन्न !

Apr 21, 2022

मनमाड शहरात प्रथमच खास महिलांसाठी महिलांनी पुढाकार घेत सायकलिस्ट क्लब ची स्थापना करीत दररोज सायकल चालवून आरोग्य ठणठणीत ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. नाशिकच्या रॉयल रायडर्स ह्या क्लब अंतर्गत स्वामिनी सायकलिस्ट क्लब ची मुहूर्तमेढ मनमाड च्या महिलांनी पुढाकार घेत केली असून ह्या क्लब चे उद्घाटन येथील भगवान वाल्मिकी स्टेडियम येथे वेटलिफ्टींग प्रकारात मनमाड शहराचे नाव देश पातळीवर नेणाऱ्या आकांक्षा व्यवहारे च्या आई सौ.हेमा व्यवहारे ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. क्लब च्या अध्यक्षा सौ.संगीता कदम – देसले यांनी प्रास्ताविक करीत सायकल चालविण्याचे फायदे विषद केले.क्लबच्या सचिव डॉ.संगीता हाके व कार्याध्यक्षा डॉ.सौ अर्चना राठी यांनी सायकलिंग केल्याने आरोग्य सुधारते , कॅलरीज बर्न होतात, मुड सुधारतो, पाय मजबूत होतात असे अनेक फायदे सायकलिंग चे असल्याचे सांगितले. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेल मध्ये होणारी वाढ, वाहनांचा खर्च, प्रदूषण आणि तापमान वाढतच असून हे रोखण्याकरीता सायकलिंग करणे हा सर्वात चांगला आणि आरोग्यदायी उपाय असून जास्तीत जास्त महिलांनी सायकल चालविण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले. यावेळी पुष्पा मतकर,स्नेहल भागवत,योगिता जंगम, सौ.कोल्हे, शुभांगी देशमुख, रेखा येणारे,वैशाली वाणी, सौ.पांडे, सौ पाटील, सौ सोनार,अंशिता जंगम,गौरी पाटील, खुशी प्रवीण मोरे,विधी गंभीरे,सिध्दी कोल्हे,हेमांगी मुळचंदानी, तेजल दखणे आदी उपस्थित होत्या.दररोज सायकलिंग करण्याचा निर्धार या वेळेस उपस्थित महिलांनी करत मैत्रिणींनाही यात सहभागी करून घेऊ या अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुरा देसले, दीदी देवरे यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]