Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल-पेट्रोलची चोरी उघड; कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक

Apr 24, 2022


मनमाड : येथून जवळ असलेल्या पानेवाडी इंधन कंपनीच्या भागात रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल – पेट्रोलची चोरी करून घरी ठेवलेला मुद्देमाल रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने छापा टाकत हस्तगत केला या कारवाईत एका रेल्वे कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे

मनमाड शहर हे इंधन कंपन्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे मात्र इंधन कंपन्या असल्यामुळे इंधन चोरीही मोठ्या प्रमाणात होत असते सदर पेट्रोल डीझल हे रेल्वेच्या इंधन वॅगनमधून बाहेर जात असते पानेवाडी येथील कंपनीतून इंधन भरून हे वॅगर बाहेर जात येत असतात डिझेल आणि पेटेल भरण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र टर्मिनल आहे इंधनाने भरलेली रेल्वे वॅगन रिकामी झाल्यानंतर सायडिंगला उभी केल्यानंतर तळाला असलेले रेल्वे वॅगनमधील पेट्रोल आणि डिझेल कॅनमध्ये भरून त्याची चोरी होते. अशी गुप्त माहिती मनमाड रेसूब पथकाला मिळाली आणि पथक वॉच ठेऊन होते. आज सकाळी अशीच गुप्त माहिती मिळाल्यावर पथकाने पानेवाडी येथे धाव घेऊन सापळा रचला या वॅगनमधून तेथील रेल्वे कर्मचारी असलेला विठ्ठल रामचंद्र सांगळे याने सदर वॅगनमधून डिझेल पेट्रोलची चोरी करून हे इंधन आपल्या पानेवाडी येथील आव्हाड वस्ती येथील घरी चोरून ठेवलेले होते सदर गोपनीय माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सदर रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता रेल्वे वॅगनमधून चोरी केलेला पेट्रोल डिझेलचा मुद्देमाल हस्तगत केला यावेळी रेल्वे कर्मचारी विठ्ठल रामचंद्र सांगळे (वय ४५), विजय दशरथ सांगळे (वय २३ दोघे रा. आव्हाड वस्ती, पानेवाडी) या संशयित आरोपी असलेल्या चुलत्या पुतण्याला मुद्देमालासह अटक केली यातील विठ्ठल सांगळे हा रेल्वे कर्मचारी असल्याने मोठी खळबळ उडाली या छाप्यामध्ये नऊ प्लास्टिकच्या कॅन मिळाल्या यात ४ कॅन मध्ये पाच हजार रुपयाचे ५० लिटर डिझेल तर ५ कॅनमध्ये नऊ हजार रुपयाचे ७५ लिटर पेट्रोल असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला दोघांनाही अटक करण्यात आली आहे. रेल्वे मालमत्ता अधिनियमनानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे या रेसुबचे मंडल सुरक्षा शितीज गुरव व सहाय्यक आयुक्त बी.पी. कशुवाह यांच्या नेतृत्वाखाली मनमाड रेसुबचे प्रभारी अधिकारी डि. के. मिश्रा, उपनिरिक्षक आर. एस. यादव, रेसुब कर्मचारी समाधान वाहुळकर, सागर वर्मा, मनिष कुमार, गजानन पाटील, विठ्ठल नागरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]