Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तांदुळवाडी येथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमीत्त बाल ग्रामसभा संपन्न

Apr 25, 2022

नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमीत्त सरपंच यादवराव काकळीज यांच्या अध्यक्षतेखाली बाल ग्रामसभा संपन्न झाली.
ग्रामीण भागाच्या शास्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रमापैकी एक संकल्प करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभीयान ‘ जल समुद्ध गाव ‘ पायाभुत सुविधा ‘ स्वच्छ व हरीत गाव ‘ आदी विषया वर चर्चा करण्यात आली.
गावातील शाळेतर्फे बालमजूरी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पधेंत उत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या बालकानां सरपंच यादवराव काकळीज ‘ सुदामराव काळे ‘ सोमनाथ घोंगाणे यांनी बक्षीसे दिली. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय साहीत्य बक्षीस म्हणून देण्यात आली.
शाळेतील बालकांनी आपल्या समस्या मांडल्या . या समस्या वरिष्टा मार्फत लवकरच सोडवू असा विश्वास पंचायत समितीचे या ग्रामसभे साठी नेमण्यात आलेले संपर्क अधिकारी एस . के . पाटणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
सदर सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापीका सौ. छाया देशमुख यांनी केले. सभेस सरपंच यादवराव काकळीज ‘ सोमनाथ घोंगाणे ‘सदस्य अंबादास काळे ‘ राजेद्र काकळीज ‘ सुदामराव काळे ‘ दतू श्रावण काळे’ बाजीराव काळे ‘ दतू भिमराव काळे ‘ सतीष काळे ‘ अंबादास भागवत काळे ‘ शिक्षीका सुनीता बागूल ‘ आशा सेवीका उज्वला काळे ‘ भाऊसाहेब काळे ‘ शेषराव काळे ‘ बापू काकळीज ‘ नाना काळे’ ग्रामपंचायत कर्मचारी नाना पवार यांचेसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते .

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]