Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रोझे येथील धनगर कुटुंबाला आमदार कांदे यांची तत्काळ मदत

Apr 26, 2022

नांदगाव विधानसभा मतदार संघातील व मालेगाव तालुक्यातील रोझे गावात शनिवारी 23 तारखेला झोपडीस आग लागून सर्व संसार जळून खाक झाला होता.
कौतिक रंगराव धनगर व पत्नी मनीषा धनगर हे आठवडे बाजारानिमित्त बाहेर गावी गेले असताना त्यांच्या झोपडीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आणि पाहता पाहता सर्व जळून खाक झाले,आधीच गरिबी त्यात ही वाईट वेळ त्या कुटुंबावर आली.कौतिक धनगर,पत्नी व तीन लहान मुली असा त्यांचा परिवार रस्त्यावर आला.
सदर परिस्थिती रोझे येथील सरपंच संजय उगले यांनी ज्ञानेश्वर कांदे यांनी कानावर टाकली असता या कुटुंबास नांदगाव येथील निवस्थानी आमदार सुहास कांदे यांनी स्वखर्चातून या कुटुंबास संपूर्ण संसार उपलब्ध करून दिला.या मध्ये संसार उपयोगी सर्व भांडे,गॅस शेगडी,साडी चोळी,ड्रेस,तीनही मुलींना कपडे,गहू तांदळाचे कट्टे, तसेच वर काही पैसे. कुटुंबास आदरपूर्वक चहा पाणी करत विचारपूस केली.झाले गेले विसरून जा मुलींकडे लक्ष द्या आणि माझी अजूनही काही मदत लागल्यास मला सांगा असा विश्वास ही याप्रसंगी आमदार कांदे यांनी धनगर कुटुंबीयास दिला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]