Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड…

Apr 27, 2022

१६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलन मध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून मनमाड येथील युवा पत्रकार आमिन नबाब शेख यांच्या नियुक्ती ची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्यचे संघटक कॉ.किशोर ढमाले यांनी केली.अमिन शेख हे मनमाड शहरांतील पत्रकार आहे. फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच,ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व सेंट्रल रेल्वे मजुदर संघ मनमाड चे हितचिंतक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिले विद्यार्थी-पालक-शिक्षक साहित्य संमेलन २०२० मध्ये मनमाड येथे भरविण्यात आले होते.त्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, दैनिक पुण्यनगरी चे मनमाड प्रतिनिधी म्हणून काही काळ काम केले आहे.साप्ताहिक मनमाड सम्राट चे ते संपादक आहे तर ते जागर जनस्थान न्युज चॅनल,E.T.Vभारत न्युज चॅनल प्रतिनिधी,दै.महानगर टाइम्स चे प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहे. परिवर्तन सोशल अकादमी च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मनमाड शहरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]