Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने २९ कुटुंबीयांना आर्थिक सहायता निधी प्रदान!

Apr 27, 2022

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने नांदगाव तालुक्यातील 29 कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली.
दारिद्र रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुषाचा आकस्मित मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे त्यांना वीस हजार रुपये आर्थिक सहायता उपलब्ध करून देण्यात येते.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत दारिद्र रेषेखालील १८ ते ५९ वयोगटातील कुटुंबातील व्यक्ती आकस्मित मृत्यू पावल्यास तातडीची मदत म्हणुन हा निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
नांदगाव तालुक्यातील या सर्व प्रकरणांची रक्कम त्वरित देण्यासाठीच्या सूचना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केल्या होत्या. त्यानुसार आज बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी वारसदारना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, सदस्य रा.काँ.ता.प्रमुख विजय पाटील, ताराबाई सोनवणे, डॉक्टर प्रविण निकम, डॉक्टर प्रभाकर पवार, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, नायब तहसीलदार श्री वाघ साहेब, अव्वल कारकून श्री डुंबरे, पवार मॅडम, चंदाताई पाटणी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड च्या कार्यकर्त्यांचा ना भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला...

read more

अन्यथा…आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

  आज 3035 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती...

read more

वेटलिफ्टींग खेळाडू नूतन बाबासाहेब दराडे हीची मनमाड नगर परिषदेतर्फे स्वच्छता राजदूत म्हणून नियुक्ती

मनमाड शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जनजागृती करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२२ अंतर्गत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]