नांदगाव येथील कैलास नगरात हनुमान जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतांनाआमदार सुहास अण्णा कांदे यांनी हनुमान मंदिराच्या कळस बांधणेकामी स्वखर्चातून एक लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले होते.
सदर रोख एक लाख रुपये निधी कैलास नगर येथील रहिवाशांकडे सुपूर्द करण्यात आला.लवकरच हनुमान मंदिराचे कळस व उर्वरित बांधकाम सुरू होण्याचा विश्वास रहिवाशांनी बोलून दाखवला.
कैलास नगर येथील राजेश शिंदे गीत शिंदे व नागरिकांनी आयोजित केलेल्या हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांनी हनुमान मंदिर कळस बांधण्यासाठी स्वखर्चातून मदत करण्याचा मानस व्यक्त केला होता.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रमोद भाबड, शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना शहर प्रमुख मुज्जू शेख, नगरसेवक कारभारी शिंदे, सचिन साळवे, माजी नगरसेवक इक्बाल शेख, शिंदे काका, निवृत्ती गाजरे, राम शिंदे, छोटू बागले, बापू कुलकर्णी, दत्तू आवारे, राठोड बाबा, पराग साळवे, राहुल ठोके, रवी रोकडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे
श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...











