मनमाड:- काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन समाजात,धर्मात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून राज्य शासनाला 3 मे पर्यंत भोंगे उतरविण्याची भाषा वापरली होती.
म्हणूनच राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेला औरंगाबाद पोलीस आयुक्त यांनी परवानगी नाकारून औरंगाबाद शहरात कलम 144 लावण्यात आले होते.
तद्नंतर राज्य शासनाने नंतर सदर सभेला परवानगी दीली आहे, सभेत राज ठाकरे तर्फे दोन समाजात व धर्मात तेढ निर्माण करण्यात येईल याची शक्यता नाकारता येत नाही कारण,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्या पासून संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून तेढ निर्माण करणारे व चिथावणी देणारे वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये आपल्या उदरनिर्वाहसाठी आलेले परप्रांतीय लोकांना आपल्या भाषणातून टार्गेट केले,परिणामी मनसे सैनिकांतर्फे परप्रांतीयांवर खूप अत्याचार करण्यात आले होते, असे प्रांतीय व्देष राज ठाकरे यांनी पसरवला आहे,. त्यानंतर नंतर छट पुजेला देखील कडाडून विरोध केला व महाराष्ट्रामध्ये पुन्हा युपी बीहारच्या लोकांवर अत्याचार करण्यात आले होते,
पवित्र रमजान महिना सुरू असतांना जाणुन बुजून दोन समाजामध्ये हिंदु-मुस्लीम दंगली घडवण्याच्या हेतूने राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलला आहे आणि महाराष्ट्रामध्ये भोंग्याचा वाद निर्माण करून दंगली घडवण्याच्या हेतूने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य केले आहे
दि 1 मे महाराष्ट्रराज्य निर्मिती दिवस या दिवशी जर आम्हाला महाराष्ट्रात कोणतीही दंगली होऊ नये या साठी निवेदन द्यावे लागत आहे तर,हे खूप मोठी शोकांतिका आहे, या महान दिनाच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्यात औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभेला आपल्या खात्या मार्फत परवानगी देण्यात आल्याने .त्या सभेत राज ठाकरे आपल्या कठोर बेताल भाषणातून दोन समाज्यात तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण यापूर्वी देखील कित्येक वेळी त्यांच्या तर्फे अशी कृती करण्यात आली आहे,
या सभे नंतर राज ठाकरे यांचे चिथावणी देणारे भाषण बेताल वक्तव्य मुळे जर महाराष्ट्रात कुठेही वाद निर्माण झाले किंवा दोन समाज्यात तेढ निर्माण झाली अथवा दुर्दैवाने जर दंगली झाले, तर सदर सर्वप्रथम प्रमुख आरोपी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच करण्यात यावे,कारण आपल्या राज्य शासनातर्फे जसे ॲड. गुणरत्न सदावर्ते याच्या काही चिथावणीखोर भाषणामुळे एस. टी. कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या बंगल्या बाहेर जो काही राडा केला म्हणून त्या घटनेचा प्रमुख आरोपी ऍड गुणरत्न सदावर्तेला केले त्याच प्रमाणे,
औरंगाबाद सभे नंतर राज ठाकरे यांच्या भाषणाने ,महाराष्ट्रामध्ये कुठेही दोन समाजात तेढ निर्माण झाले अथवा दुर्दैवाने जर दंगली झाले तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच प्रमुख आरोपी करून गुन्हा नोंद करावा. जर दंगली झालेत अन त्या दंगलीत जर राज्याचे नुकसान झाले तर महाराष्ट्र राज्याचा झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई देखील राज ठाकरे त्यांच्या तर्फे वसूल करण्यात यावी,
गुढीपाडव्याच्या दिवशी सभेत 3 मे पर्यंत मजिदी वरील भोंगे उतरले नाहीत तर आम्ही मजिदी समोर हनुमान चालीसा म्हणू असं वक्तव्य करत, राज ठाकरे यांनी दोन समाजात तेढ निर्माण केले आहे,
व महाआघाडी सरकारला एक प्रकारे धमकी दिली आहे,
म्हणून भारतीय राज्य घटनेने आपल्याला दिलेल्या अधिकाराचा वापर करून व नेहमी धार्मिक,सामाजिक,प्रांतद्वेष पसरविणाऱ्या राज ठाकरे यांच्या वर महाराष्ट्रात भाषण बंदी घालून आपल्या तर्फे राज्य धर्म पाळण्यात यावा, जेणे करून आपल्या राज्यात भारतीय घटने नुसार, समता,बंधुता ही वाढेल,असे निवेदन महाराष्ट्र राज्य गृह मंत्री साहेब यांच्या नावाने,मनमाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जांभळे साहेब,यांच्या सुपूर्द करण्यत आले यावेळी,सैय्यद कयाम,कादिर शेख,फिरोज शेख,ऍड आम्रपाली ताई निकम,सद्दाम अत्तार, संदीप घोडके,यशवंत बागुल,मीर्जा अहेमद बेग (बेगचाचा) हाजी शफी मुसा,शकुर शेख, आनंद शिंनगारे, गणेश एळींजे,राकेश पगारे,संदीप खरे,शेख इकबाल,निलेश निकम, अनवर मंसुरी,वसीम तांबोळी,जावेद शेख,बिलाल मणियार,आयाज शेख,
असलम शाह,वाल्मिकी पाटील,संदीप जाधव,












