Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०८ वा वर्धापन दिन साजरा

May 1, 2022

कोरोना महासंकट काळात आणि सोशल मीडिया च्या महापुरात ही दीपस्तंभा सारखे कार्य करीत मनमाडकरांची बौद्धिक भूक भागविणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०८ वा वर्धापन दिन साजरा

मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या वर्धापन दिना निमित्ताने ०१ लाख १० हजार रुपयेपेक्षा जास्त किंमतीची ४४० नवीन पुस्तकांची ग्रंथसंपदा वाचकांना समर्पित

मनमाड- मनमाड शहराच्या सामाजिक ,साहित्य, सांस्कृतिक,शैक्षणिक परंपरे मध्ये मानाचा केंद्रबिंदु असणार्‍या व ऐतिहासिक शतकोत्तर महोत्सव वाटचाल करणार्‍या व दि.०१ मे १९१५ रोजी स्थापन झालेल्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०८ वा वर्धापन दिन (स्थापना दिन) कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या मंचावर प्रमुख अतिथी , मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष व सुप्रसिध्द कवी प्रदिप गुजराथी, संचालक नरेश गुजराथी, सुरेश शिंदे,प्रज्ञेश खांदाट आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्या देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या शतकोत्तर वाटचाली ची माहिती सचिव कल्पेश बेदमुथा यांनी आपले स्वागत प्रास्ताविक मनोगत मध्ये दिली. यंदा या १०८ व्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वाचकांसाठी सुमारे ०१ लाख १० हजर रुपयेपेक्षा जास्त किंमतीच्या ग्रंथसंपदा ४४० नवीन पुस्तके वाचकांना वाचना साठी खुली करण्यात आली. या ग्रंथसंपदेमध्ये कथा,कथासंग्रह,कादंबरी, कवीता, ललितसाहित्य,लेखसंग्रह, माहितीपर, नाटक, महिला विषयक, कायदेविषयक,, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान,आध्यात्मिक, प्राणी शास्त्र, संदर्भ ग्रंथ, पर्यावरण,वास्तुशास्त्र, ज्योतीष्य, धार्मिक, व्यावसायिक, व्यापार विषयक आरोग्य विषयक, शैक्षणिक, स्पर्धा परिक्षा विषयक, , बाल व किशोर वाड्मय, हिंदी तसेच इंग्रजी, शेतीविषयक, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन, क्रीडाविषयक, पाककला, हस्तकला, चित्रपटविषयी, राजकारण, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, इतिहास, संगीत विषयक , खगोलशास्त्र,गुंतवणूक विषयक , व्यापार विषयक, तंत्रज्ञान विषयक,,सोशल मीडिया संबंधित, विनोदी साहित्य,संशोधन विषयक, प्रवासवर्णन, सामान्य ज्ञान, अनुवादित पुस्तके ,युध्द कथा,रहस्यमय कथा कादंबरी,आदी विषयांच्या पुस्तकांन सह इतर अनेक विषयांचा समावेश असणारी पुस्तके असून मनमाड सार्वजनिक वाचनालयातील वाचक वर्गाला या वर्धापनदिनानिमित्त ही एक प्रकारे नवीन ग्रंथसंपदेची पर्वणी  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गत दोन वर्षात निर्माण झालेल्या कोरोना महासंकट काळात आणि नव्याने आलेल्या सोशल मीडिया च्या महापूरात ही जागरूक वाचकांनसह सर्वांच्या अनमोल सहकार्य ने मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा सामाजिक दीपस्तंभ उभा आहे या उत्तम प्रकाशनाच्या नवीन ग्रंथ संपदेचा सर्व स्तरातील वाचकांनी भरभरून लाभ घ्यावा असे आवाहन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी याप्रसंगी केले. या वर्धापन दिन कार्यक्रमास अक्षय सानप मछिंद्र साळी मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने वाचक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा व संचालक मंडळाने केले. 

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]