Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अ.भा. मराठा महासंघ नांदगावच्या वतीने स्वखर्चाने उभारण्याचा निर्णय

May 2, 2022

मावळ प्रांताची साम्राज्ञी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येणाऱ्या 31 मे 2022 जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांचा आकर्षक पुतळा अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुक्याच्या वतीने स्वखर्चाने उभारण्याचे बहुमताने ठरले आहे,काशी मथुरा सोमनाथ इत्यादी अशा जगप्रसिद्ध पुरातन मंदिराचे जीर्णोद्धार ज्यांनी केले ठिक ठिकाणी प्रवासी येणे करू वाटकरु सर्वांसाठी धर्मशाळा, घाट बांधले विहिरी खोदल्या अनेक मंदिरांचे नवनिर्माण केले आपल्या कार्य कर्तुत्वावर दैवत्व प्राप्त केले अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा चौथरा नांदगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बांधून तयार असताना एवढी अनास्था शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून बाळगली जाते याचा खेद वाटतो आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे 2022 रोजी येणाऱ्या जयंती उत्सोव दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने स्वखर्चाने आकर्षक असा पुतळा व मोठा कार्यक्रम उभारण्यात येणार आहे असे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची पत्रक महासंघाचे नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे व उपजिल्हाप्रमुख भास्कर झाल्टे यांनी जाहीर केल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या शासकीय परवानग्याची पूर्तता मराठा महासंघ करत असून आज शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धनगर समाज बांधव अशी संयुक्त बैठक घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा प्रदर्शित करून दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या अहिल्यादेवी पुतळ्याच्या प्रश्नाला जवळजवळ सोडवलेच असे सिद्ध केले असून येणाऱ्या 31 मे ला सदर पुतळा हा मोठ्या उत्साहात विराजमान करणार यासाठी आपण प्रयत्नशील आहोत बैठकीदरम्यान धनगर समाज बांधवांकडून या प्रश्नाला वेळोवेळी हुलकावणी दिली गेले असल्याचे बोलले गेले तेंव्हा मराठा महासंघाने तरी किमान हा प्रश्न कुठलेही राजकारण न करता तो पूर्णत्वाला न्यावा .जोही कुणी कायदेशीर रित्या सर्व परवानग्या आणून हा प्रश्न मार्गी लावेल त्याच्यासोबत आम्ही आहोत असे समाज बांधवांनी सांगितले.आम्हाला केवळ गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न पूर्ण व्हावा एवढीच अपेक्षा आहे. तर अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने आम्ही यात कुठलेही श्रेयवादाची भूमिका न ठेवता कुणी म्हटलेच कि आम्ही यासाठी खरे प्रयत्न केले तर आम्ही दहा पावले मागे येऊ मात्र सर्वाना सोबत घेऊनच हा प्रश्न मार्गी लावू.सदर बैठकी दरम्यान शिवाजी पाटील,डॉ.गणेश चव्हाण,सुनील सोर,तकदीर सरोदे,बिरु शिंदे,शरद आयनोर,सचिन देवकाते,संतोष शिंदे,हिंमत शिंदे,राम शिंदे,नामदेव तांबे,बापू शिंदे,गंगाधर शिंदे,सखाराम चव्हाण,सुमित वाघमोडे,सागर नरोटे,बिरुदेव देवकाते,कडूबा शिंदे,चंद्रशेखर खेमनर,सुनील मेंगणर, भिका खटके,सागर मोरे,गोरख नेमनर,छोटू नेमनर,योगेश गायकवाड,गणेश शिंदे,कारभारी शिंदे,किसन शिंदे,नरेंद्र कर्नर, गोयकर बाबा,अशोक खरात,नाना खरात आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते.

सदर बैठकीत मराठा महासंघद्वारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरी होत आहे. यानिमित्ताने अहिल्यादेवी होळकरांचे चरित्र कार्य संपुर्ण महाराष्ट्रभर पोहचवावा ही आज काळाची गरज आहे. परंतु जाती व्यवस्था नष्ट होण्या ऐवजी ती इतकी प्रबळ होत चालली आहे की या जाती व्यवस्थेने माणसांची विभागणी केली असे नाही तर त्यांच्या सामाजिक प्रश्नाची आणि राष्ट्रपुरुषांची सुध्दा विभागणी केली. या विचारांना कुठे तरी छेद द्यावा या प्रामाणिक हेतूने आम्ही गेल्या 1995 पासून प्रलंबीत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या पुतळ्याचा प्रश्न सुध्दा मराठा महासंघाने हाती घ्यावा अशी आग्रही मागणी विविध माध्यमातून होऊ लागली.

अखिल भारतीय मराठा महासंघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार धारेवर चालणारी संघटना आहे. आम्ही जात पात मानत नाही, मराठा समाज पुर्ण महाराष्ट्रात नं. 1 चा मोठा समाज असल्याने इतर इतर सर्व अल्पसंख्याक बहुजन समाजाची सेवा करणे त्यांच्या अडी अडचणी सोडविणे त्यांच्या सामाजिक प्रश्नाना वाचा फोडून ते मार्गी लावणे हे आम्ही मोठा भाऊ म्हणून या न्यायाने आमचे कर्तव्य समजतो.

लोकमाता अहिल्यादेवी होळकर या देशाच्या अस्मीता नाहीत का ? त्यांनी केलेली रचनात्मक कार्य,धर्मशाळा, पाणगोठे, रस्ते, अन्नछत्र हे सर्व असतांना मग त्यांच्या पुतळ्याची मागणी फक्त धनगर समाजानेच का करावी ? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दलितांनीच का साजरी करावी? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काही ठरावीक लोकांनीच का साजरी करावी ? असे प्रश्न आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना पडतो.

राष्ट्रपुरुष हे कधीच एका जातीचे नसतात, त्यांचे काम हे जातीच्या पलीकडील असल्याने ते राष्ट्र पुरुष झाले. त्यावर सर्वांचेच समान अधिकार व हक्क असतो.
आम्ही कोणाचे विरोधक नाही, मराठा महासंघ कोणतीही निवडणूक लढवत नाही, मराठा महासंघाचा कोणताही राजकीय स्वार्थ नाही.

लोकमाता अहिल्या देवीचा पुतळा हा सामाजिक अस्मितेचा विषय आहे, तो वैयक्तीक कोणाचा विषय नसल्याने आम्ही सर्व आजी माजी लोक प्रतिनिधी, तालुक्यातील आदरणीय जेष्ठ व्यक्ती आणि सर्व समाज बांधव यांच्या मदतीने व सहकार्याने आम्ही हे सत्कार्य पुर्णत्वास नेऊ शकतो याची आम्हाला जाणीव आहे.

आम्हाला आज पर्यंत ज्या व्यक्तींनी विविध माध्यमातून मदत केली काहींनी मदत करण्याचे वचन दिले त्या सर्वांना मराठा महासंघाचा मानाचा जय मल्हार…!

आज 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आकर्षक असा पुतळा आपल्या सर्वांचे कृपाशिर्वादाने व साक्षीने प्रदर्शित करीत आहोत.सदर पत्रकावर भास्कर झालटे, भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण,बापू जाधव,विशाल वढघुले, रविंद्र ताडे, गणेश काकळीज आदींच्या सह्या आहेत.

 

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]