Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड नगर परिषदेतील विविध कामगार संघटनांचा कामबंद आंदोलनात सहभाग

May 2, 2022

महाराष्ट्रातील नगर परिषद ,नगरपंचायत कर्मचा-यांच्या मागण्यांसंदर्भात विविध निवेदन देऊन आंदोलन करुन शासन सदरील प्रश्नांचे विचार न केल्यामुळे संघटनेच्या वतीने खालील मागण्या
1)प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला 100% वेतन कोषागार मार्फत मिळावे तसेच
2) 10,20 30 वर्ष सेवा झालेल्या कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा.
3)सातवा वेतन आयोगाची फरकाची तीन हप्ते मिळावेत.
4)नवीन झालेल्या नगरपंचायत मधील सर्व कर्मचाऱ्यांना विनाशर्त विनाअट समावेशन करावे. नवीन नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांची आकृतिबंध मध्ये पदनिर्मिती करावी
5)सेवेत असताना मध्ये मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपा योजनेअंतर्गत नियुक्ती द्यावी 6)नगरपरिषदेची थकीत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी.
7) हंगामी व ठेकेदार कर्मचाऱ्यांना किमान वेतन याप्रमाणे वेतन अदा करावे
8) पात्र कर्मचा-यांचा संवर्गात समावेशन करावे
व इतर विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सर्व 400 नगरपालिका नगरपंचायत मधील दोन लाख कर्मचारी सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बेमुदत काम बंद आंदोलन होणारच अशी भूमिका घेतल्याने दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी नगरविकास सचिव महेश पाठक, मा सचिन सहस्त्रबुद्धे व महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली मात्र ठोस निर्णय न झाल्यामुळे दि 1 मे 2022 पासुन झेंडा वंदन झाल्या नंतर कामबंद आंदोलन राज्यभर सुरु करण्यात आले असता त्या पार्श्वभूमीवर दि 1मे 2022 रोजी श्री सचिनकुमारजी पटेल मा मुख्याधिकारी सो म.न.प.मनमाड यांना निवेदन देण्यात आले तसेच दि 2 मे 2022, रोजी मनमाड नगर परिषदेत द्वारसभा घेऊन कामबंद आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला यावेळी श्री रामदास पगारे (सिटु संघटना जनरल सेक्रेटरी) व श्री नितीन पाटील(अध्यक्ष , म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ) यांनी पाठींबा जाहीर करत त्यांचे संघटनेची भुमिका मांडली तसेच यावेळी श्री किरण आहेर (राज्यउपाध्यक्ष,महाराष्ट्र नगर परिषद,नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटन) यांनी कामगारांच्या विविध मागण्या बाबत तसेच संघटनेच्या भुमिकेबाबत कामगांरासमोर मत मांडुन पाठींबा देणा-या संघटनेचे तथा कामगार बांधवांचे आभार मानले यावेळी श्री प्रमोद सांगळे,शाखा अध्यक्ष,महाराष्ट्र नगर परिषद ,नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना,श्री अशोक पाईक ,कार्यालयीन पर्यवेक्षक,श्री राजेंद्र पाटील ,आस्थाटना पर्यवेक्षक,श्री नाना जाधव,लेखापाल,श्रीमती साधना खराटे,लेखा परीक्षक तसेच आनंद औटी,मिलिंद पुरंदरे,संजय गवळी,कैलास पाटील,दिपक पांडे,जावेद शेख,नंदुरबार म्हस्के, संजय आरोटे,राजेंद्र जगताप,प्रविण जोशी,रमेश थोरे,रवि वागळे,निता धुमाळ,पॄथ्वीराज कोळगे,अशोक कटारे,सुनिल दराडे,मेहमूद शेख
विकास गायकवाड,मिलिंद गांगुर्डे ,लक्ष्मण चव्हाण,चंद्रकांत झाल्टे,बाबा बनसोडे,,सुशांत राजगुरु,किशोर व्यवहारे,मुक्तार शेख,अस्लम शेखसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते अशी माहीती श्री किरण आहेर यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]