Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री नेमिनाथ जैन ब्राह्मचर्याश्रम संचलित श्री एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतनात कन्स्ट्रो 2022 स्पर्धा व फन फेअर ISTE विद्यार्थी अध्याय आणि CESA अंतर्गत कार्यक्रम संपन्न.

May 3, 2022

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्राह्मचर्याश्रम संचलित श्री एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतनातील सिव्हील विभागातर्फे कन्स्ट्रो 2022 ही राजस्तरीय स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेमध्ये टेक्निकल व नॉन टेक्निकल अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या घेण्यात टेक्निकल स्पर्धेत पोस्टर प्रेझेंटेशन, ब्रिज मेंनिंग व नॉन टेक्निकल मध्ये कॅरम, रिल ईन फिल असे कार्यक्रम घेण्यात आले स्पर्धेमध्ये एकुण ६० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला टेक्निकल स्पर्धेसाठी पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक सम्यक डुंगरवाल व दुसरा क्रमांक स्नेहल चौधरी यांनी पटकाविला तसेच ब्रिज मेंनिंग मध्ये प्रथम क्रमांक गणेश जाधव व दुसरा क्रमांक यश आहिरे यांनी पटकाविला नॉन टेक्निकल स्पर्धेसाठी कॅरममध्ये प्रथम क्रमांक ओम जैन व हिमांशू संकलेचा यांनी पटकाविला दुसरा क्रमांक धर्मपाल डांगी व अर्पित जैन यांनी पटकाविला रिल ईन फिल मध्ये प्रथम क्रमांक संपदा विसपुते व दुसरा क्रमांक रक्षा घोरपडे यांनी पटकाविला या स्पर्धेमध्ये ब्रिज मेंनिंगसाठी प्रा. वैभव बी. राजनोर व पोस्टर प्रेझेंटेशनसाठी प्रा. सोनाली बी. शिंदे तसेच कॅरमसाठी प्रा. कुणाल के. काळे व रिल इट फिल इट साठी प्रा. सृष्टि यु. शिरसाठ यांनी काम बघितले तसेच या स्पर्धेमध्ये विजेत्या व उपविजेत्या आलेल्या मुलाना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन अंकिता एस. डुंगरवाल यांनी केले तसेच सिव्हील विभागातर्फे फन फेअर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मुलांनी वेगवेगळे स्टॉल लावले होतें या फन फेअरचा माध्यमातून त्यांना व्यवसाय कसा करावा व मिळालेल्या उत्पनाचा हिशोब कसा ठेवाव याचे ज्ञान मिळाले या कार्यक्रमाचे नियोजन प्रा, डी. बी. पवार यांनी केले या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ, व्ही. ए. वानखेडे व सिव्हिल विभागाचे विभागप्रमुख प्रा, एस. एच. गौडा, यांनी मार्गदर्शन केले.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे थायलंड येथे होणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे थायलंड येथे होणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार….

योगेश म्हस्के मनमाड : मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे...

read more
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून...

read more
धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी केली अटक – १,११,००० चा मुद्देमाल हस्तगत

धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी केली अटक – १,११,००० चा मुद्देमाल हस्तगत

बिहार राज्यातील मजूर अमर रामकृष्ण वय 29 वर्ष, धंदा- मजुरी, रा.मु.पो.बलेख जि. खागरिया राज्य बिहार...

read more
बघा व्हिडिओ – मनमाडच्या वीणाताई आहेर ने स्थापित केला राष्ट्रीय विक्रम, पटकाविले सुवर्णपदक

बघा व्हिडिओ – मनमाडच्या वीणाताई आहेर ने स्थापित केला राष्ट्रीय विक्रम, पटकाविले सुवर्णपदक

बेंगलोर येथे सूरु असलेल्या चौथ्या महिला मानांकन राष्ट्रिय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]