योगेश म्हस्के
मनमाड : मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रा. श्री नितिन लालसरे हे हिंदुस्थान आर्ट अँड म्युजिक सोसायटी द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ थायलंड येथील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे.
हिंदुस्थान आर्ट अँड म्युजिक सोसायटी गेल्या दहा वर्षांपासून विविध देशात आणि भारतातील अनेक शहरांमध्ये आपल्या भारत देशाच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन होण्यासाठी भारत संस्कृत यात्रेचे आयोजन करत आहे , यामध्ये आपल्या देशातील अनेक क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी होऊन आपली कला सादर करत असतात.यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम बँकॉक थायलंड येथे 2 एप्रिल रोजी होणार असुन यामध्ये मलेशिया ,दुबई , थायलंड आणि आपल्या भारत देशातील एकुण 16 राज्यातील नामवंत कलाकार सहभागी होणार आहे.
यंदाच्या वर्षीच्या थायलंड येथे होणाऱ्या ‘भारत संस्कृत यात्रा’ या कार्यक्रमासाठी प्रा.श्री नितिन लालसरे यांना विशेष प्रमुख अतिथी म्हणुन निमंत्रीत करणे ही निश्चितच अभिमानाची बाबा असुन यासाठी त्यांचे अनेकांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.