loader image
[ays_poll id=7]

जलसमृद्धीतून विकासाकडे उपक्रमातून मोरझरला संजीवनी कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न.

May 3, 2022

मोरझर – गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार संकल्पना .

नांदगावच्या दक्षिण भागातील मोरझर येथे युवा मित्र संस्थेने जलसमृद्धी तून विकासाकडे या उपक्रमांतर्गत जलसाठा समृद्ध करण्यासाठी गावातील लेंडी नदी व सिमेंट बंधारे पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढवण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
मोरझर गाव दुष्काळाच्या खाईतुन मुक्त करण्यासाठी गावच्या सरपंच सौ.लिना समाधान पाटील यांनी सातत्याने पत्रव्यवहार करुण युवामित्र संस्थेकडे पाठपुरावा केला.त्यांच्या पाठपुराव्याची योग्य दखल घेतली आणी न्याय दिला .
टाटा ट्रस्ट व गॅलक्सी या दोन संस्थांनी यासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे.
युवा मित्राच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरझर येथील गावाजवळील नदीच्या खोली करणाच्या कामाचा प्रारंभ झाला. वर्षनुवर्ष साचत असलेल्या गाळामुळे गावातील पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी तलावाचा उपयोग होत नव्हता .सरपंच व स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन युवा मित्रची जलसमृद्धीतुन विकासाकडे ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.
सदर कामाचे उदघाटन सरपंच सौ.लिना पाटील यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मोरेश्वर गाळ उपसा समितीचे अध्यक्ष सचिन चोळके,सुर्यभान चोळके,कैलास चोळके,वसंत चोळके,श्रावण चोळके,वाल्मिक गायके, महेंद्र चोळके,योगेश निकम,सतिष चोळके,अंबादास सोनवणे ,भाऊसाहेब चोळके,प्रकाश चोळके,देविदास पाटील, रामनाथ चोळके,पंडीत चोळके,संजय चोळके,दत्तात्रय चोळके,विनायक चोळके,अशोक चोळके,नारायण निकम,गणपत पावशे,हिरामण माळी,संतोष सोनवणे,आदी शेतकरी व युवा मित्रचे पदाधिकारी तुळशीराम घागरे ऋषिकेश डांगे कमलेश काळे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना बंधाऱ्यातील गाळ आपल्या शेतात टाकून जमीन सुपीक करून घेण्याचे आव्हान केले. व गाळ वाहून नेण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली .

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.