Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दोन वर्षानंतर ईद चा उत्साह द्विगुणित : मनमाड शहरात रमझान ईद उत्साहात साजरी

May 4, 2022

मनमाड – ईद-उल-फ़ित्रं अर्थात रमजान ईद मनमाड शहर व परिसरात पारंपरिक पध्द्तीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने ईदगाहसह शहरातील सर्वच मस्जिदमध्ये ईदची नमाजपठण करण्यात आले तर सर्वांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या

येथील ईदगाह मैदानांवर मौलाना यांच्या नेतृत्वाखाली ईदची सामूहिक नमाजपठणाचा कार्यक्रम करण्यात आला यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाने विशेष व्यवस्थेचे नियोजन केले होते. समता, बंधुभाव आणि एकात्मता रहावी यासाठी दुआ करत ईद साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांत मोठ्या उत्साहाचे वातावरण होते तर शिरखुर्मा देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. मुस्लिम बांधवानी कब्रस्तानमधे जाऊन आपल्या पुर्वजासाठी दुवा पठन केली ईदगाह मैदानावरील सामुदायिक नमाज झाल्यानंतर मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, मंडल अधिकारी श्री नरोटे आदींनी मुस्लिमबांधवांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या नमाज पठण करून येणाऱ्या मुस्लिम बांधवांचा गुलाब पुष्प देत स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रम शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, अमिन पटेल, जाफर मिर्झा, चेतन सांगळे, संदीप सांगळे, राजू सांगळे, राहुल सांगळे, सचिन दरगुडे, मुन्ना दरगुडे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, आदी उपस्थित होते. शहरातील नगिना मस्जिद येथे ही युवा सेनेचे शहरप्रमुख अंकुश गवळी,अमोल दंडगव्हाल,परेश (छोटू) राऊत, राहील मंसुरी आदींनी मुस्लिम बांधवांना पुष्प देत ईद च्या शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]