Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी असो तर्फे इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा संपन्न

May 4, 2022

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा तर्फे भुसावळ डिव्हीजन मधील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी भव्य इंटरडीपार्टमेंटल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, माजी नगरसेवक संजयभाऊ भालेराव संजयभाऊ कटारे,पापा थॉमस, पत्रकार अमिन शेख,ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे उपस्थित होते.
उद्घाटन सामना कृष्णा इगतपुरी ११ व वर्कशॉप बी या दोन संघांत झाला.
कृष्णा इगतपुरी ११या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.वर्कशॉप बी संघाने ८षटकांत ३४ धावा केल्या.कृष्णा इगतपुरी ११संघाने ४षटकात ३४धावा करू उद्घाटन सामना जिंकला.
सदर सामना मध्ये सामनावीर बाळू वाझे यांना देण्यात आले.
सदर सामन्याला प़च म्हणून किरण वाघ व राजू वाघ यांनी काम केले तर स्कोअर म्हणून अनिल कांबळे यांनी काम केले तर धावते समालोचन राजू संसारे यांनी केले.

सदर स्पर्धेला प्रथम क्रमांक चे बक्षीस ७७७७/-रू पापाभाई थॉमस यांच्या कडून देण्यात आले तर द्वितीय क्रमांक चे बक्षीस ५५५५/- रू संजय भाऊ कटारे यांनी दिले तर तृतीय क्रमांक चे बक्षीस ३३३३/-रू रत्नदीप पगारे यांनी दिले.
प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच चे स्मृती चिन्ह हे वसंत सोनवणे यांच्या कडून देण्यात आले आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे, सम्राट गरुड, भिमराव धिवर, वसंत सोनवणे,दिपक बागुल,राजू संसारे,रोहन उबाळे, मंगेश जगताप, अजित जगताप, संजय संसारे, अभिमान बोरसे,विजय विसपुते,सतिष झाल्टे राहुल केदारे, जण परीश्रम घेत आहेत.

अजून बातम्या वाचा..

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….

योगेश म्हस्के मनमाड : येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने आई...

read more
मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

मनमाड,ता.२१: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा...

read more
दृष्टीक्षेप  – विश्वचषक 2023 विशेष संदीप देशपांडेन्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मतभारताला दाखवावीच लागेल

दृष्टीक्षेप – विश्वचषक 2023 विशेष
संदीप देशपांडे
न्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मत
भारताला दाखवावीच लागेल

भारतात खेळवली जाणारी विश्वचषक स्पर्धा आता प्रत्येक दिवसागणिक व सामन्यागणिक रंगतदार होते आहे....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]