नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री सिद्धबाबा धर्मनाथ जी महाराज सेवाभावी संस्था संचलित एम.डी. काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल येथे
नवरात्री दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजनाद्वारे नवरात्रीच्या निमित्ताने गरबा (दांडिया )चे आयोजन करण्यात आले जगदंबा माता नवरात्रीच्या निमित्ताने शाळेमध्ये गरब्याची धूम करण्यात आली प्रत्येक विद्यार्थी रंगबेरंगी घागरा ,चोली कुर्ता ,पायजमा अशा गुजराती पारंपारिक पद्धतीने परिधान केले होते. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीने आप आपल्या गरबा नाचण्याच्या मस्तीत नाचत बागडत होते मोठे मोठे पण लहान चिमुकले यांनी ही वेशभूषा व नाचण्याचा पुरेपूर आनंद घेतला. गाण्याच्या मधुर तालात सर्व शिक्षक व शिक्षक वृंद दंग झाले होते. त्यात शाळेचे चेअरमन दिनेश काळे सर व प्रिन्सिपल नेहा काळे मॅडम यांनी ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी बरोबर गरबा (दांडिया )चा आनंद घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन वंदना इंगोले ,रोशनी ठेंगे .साक्षी अहिरे .मनीषा डोके, दीपिका बोरसे, प्राजक्ता काकळीज, कविता आयनोर भाग्यश्री सूर्यवंशी ,अर्चना इंगोले. श्री ज्ञानेश्वर सुरसे ,श्री प्रभाकर आहेर व सहकारी योगिता सोनार यांनी केले.